RBI Assistant Recruitment 2020: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank of India) पदवीधर तरूण तरूणींसाठी नोकरीची संधी खुली झाली आहे. सुमारे 926 जागांसाठी सहाय्यक (Assistant) या पदांसाठी ही नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वर्षात तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी दडवू नका. rbi.org.in या ऑनलाईन साईटवर तुम्ही सहाय्यक पदांसाठी अर्ज करू शकता.
दरम्यान आरबीआयमध्ये सहाय्यक पदांसाठी उमेदवारांना लेखी परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. अंदाजे ही परीक्षा 14 फेब्रुवारी दिवशी असेल तर महाराष्ट्रात मुंबई, नागपूर मध्ये ही परीक्षा होणार असून मराठी, हिंदी आणि कोकणी भाषेमध्ये परीक्षा देण्याची सोय आहे.
उमेदवारांची शैक्षणिक पात्रता किमान 50% % गुणांसह कोणत्याही विषयात पदवी आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तर उमेदवाराचे वय किमान 20 आणि कमाल 28 वर्ष असणं आवश्यक आहे. तर अर्जासाठी शुल्क खुल्या गटातील, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांनासाठी 450 रूपये तर SC / ST / PWD / Ex-S वर्गातील उमेदवारांसाठी 50 रूपये आहे. आरबीआयमध्ये सहाय्यक पदासाठी सुरू असलेल्या या नोकरभरतीसाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे.