मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रतलाम जिल्ह्यात रतलाम-डॉ. आंबेडकर नगर डेमू ट्रेनच्या (Ratlam-Dr Ambedkar Nagar Demu train) दोन डब्यांना भीषण आग (DEMU Train Caught Fire) लागली. ही घटना रविवारी (23 एप्रिल) सकाळी घडली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, रतलामपासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या प्रीतम नगर रेल्वे स्थानकावर सकाळी 7 वाजता झालेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पश्चिम रेल्वेचे रतलान विभागाचे जनसंपर्क अधिकारी खेमराज मीना यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, डेमू ट्रेनने रतलाम स्थानक सोडल्यानंतर, प्रीतम नगर रेल्वे स्थानकावर डीईएमयू (डिझेल-इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट) ट्रेनच्या ड्रायव्हिंग मोटर कोचला (ट्रेनच्या मध्यभागी ठेवलेले) आग लागली. ही आग आटोक्यात आणेपर्यंत शेजारच्याही डब्याला आग लागली.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पुढच्या काहीच वेळात अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. सध्या आग आटोक्यात आणली गेली आहे. दरम्यान, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. तसेच विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) घटनास्थळी रवाना झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचा मार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही, असेही अधिकारी म्हणाले. (हेही वाचा - Watch: धुळे-सोलापूर महामार्गावर ट्रकला भीषण आग; केबिन पूर्णपणे जळून खाक, व्हिडीओ व्हायरल)
DEMU ट्रेन
DEMU ट्रेन (डिझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट) ही भारतात वापरली जाणारी ट्रेन आहे. ही एक स्वयं-चालित रेल्वेकार आहे. जी डिझेल इंजिन आणि इलेक्ट्रिक जनरेटरद्वारे चालविली जाते आणि कमी अंतराच्या प्रवासी प्रवासासाठी डिझाइन केलेली आहे. DEMU गाड्या भारतात लोकप्रिय आहेत कारण त्या तुलनेने स्वस्त आहेत. शिवाय त्या नॉन-इलेक्ट्रीफाईड रेल्वे लाईन्सवर चालवल्या जाऊ शकतात. त्यांच्या कार्यक्षमता, वेग आणि कमी आवाज पातळीसाठी देखील या ट्रेन ओळखले जातात.
ट्विट
#WATCH | Madhya Pradesh: Fire broke out in the generator car of Ratlam-Dr Ambedkar Nagar Demu train at Pritam Nagar station in Ratlam earlier this morning. The fire was later extinguished. No injuries or casualties reported. pic.twitter.com/hrT3GRGhby
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) April 23, 2023
भारतीय रेल्वेचे विविध झोन जसे की, उत्तर रेल्वे, दक्षिण रेल्वे, पूर्व रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि इतरांसह DEMU ट्रेन चालवतात. भारतातील काही लोकप्रिय DEMU ट्रेन सेवांमध्ये पुणे-लोणावळा DEMU, म्हैसूर-धारवाड DEMU आणि चेन्नई बीच-आवाडी DEMU यांचा समावेश आहे. एकूणच, DEMU ट्रेन्स भारतीय रेल्वे प्रणालीमध्ये एक महत्त्वाची भर पडली आहे, ज्यामुळे कमी अंतराच्या प्रवासासाठी एक सोयीस्कर आणि परवडणारी वाहतूक व्यवस्था आहे.