Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

Rat Nibbles Child’s Toe: राजस्थानमधील (Rajasthan) सर्वात मोठ्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये (Cancer Hospital) निष्काळजीपणाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉस्पिटलमध्ये ब्लड कॅन्सरने त्रस्त असलेल्या 10 वर्षांच्या निष्पाप मुलाच्या पायाचे बोट उंदरांनी कुरतडले. त्यानंतर दुसर्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. उंदीर चालवण्यानंतर मुलाने आरडाओरडा केला, त्यानंतर कुटुंबीयांनी पांघरून उचलले असता त्याच्या पायाचे बोट उंदीर कुरतडत असल्याचे दिसले. त्यानंतर कुटुंबीय ताबडतोब डॉक्टरांकडे धावले, नंतर नर्सिंग स्टाफने मुलाच्या पायाला औषध लावले आणि पायाला पट्टी बांधली. आज सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अहवालानुसार, 11 डिसेंबरला मुलाला जयपूर कॅन्सर हॉस्पिटलच्या ऑन्कोलॉजी विभागातून बालरोग विभागात हलवण्यात आले होते. या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे, अचानक रात्री झोपताना मूल जोरजोरात रडू लागल्याने घरच्यांनी ब्लँकेट काढून पाहिल्यावर ते आश्चर्यचकित झाले. मुलाच्या पायाच्या बोटावर उंदीर कुरतडत होते. उंदीर चावल्याची माहिती कर्मचाऱ्यांना मिळाल्यावर एक कर्मचारी केवळ जखमेवर मलमपट्टी बांधून निघून गेला, असा आरोप आहे. मात्र उंदराच्या चाव्यामुळे मुलाचा मृत्यू झाला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. (हेही वाचा: Goa Shocker: 32 किमी मॅरेथॉनमध्ये पदक जिंकून घरी आल्यानंतर 39 वर्षीय दंत शल्यचिकित्सकचा मृत्यू)

हे प्रकरण जयपूरच्या स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूटचे आहे. या रुग्णालयात अस्वच्छतेचे वातावरण असून त्यामुळे कुत्रे, मांजर, उंदीर मोकाट फिरत असतात. या रुग्णालयात उंदरांची मोठ्या प्रमाणावर दहशत आहे, ते रात्रीच्या वेळी आणखी दहशत निर्माण करतात आणि इकडे तिकडे फिरू लागतात. याशिवाय भटकी कुत्री व इतर प्राणीही रुग्णालयाच्या आवारात फिरताना दिसतात. तेथे बांधकाम सुरू असल्याने सुरक्षा कर्मचारीही तैनात नाहीत. रुग्णालयात सफाईसाठी कंत्राटी कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र तरीही रुग्णालयाची स्थिती सुधारत नसल्याचे चित्र आहे.

रुग्णालयाच्या आवारात विखुरलेल्या खाद्यपदार्थांमुळे उंदीर व इतर प्राण्यांचा रुग्णालयाच्या आवारात सतत वावर असतो. आता मुलाच्या मृत्यूवर राज्य कर्करोग संस्थेचे अधीक्षक डॉ. संदीप जासुजा सांगतात की, बाळाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. अनेक प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. त्याच्या संपूर्ण शरीरावर व्रण होते. जासुजा पुढे म्हणाले की, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस व्यवस्था करण्यात येत आहे.