Ramdas Athawale | (Photo Credits-Facebook)

रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी वाराणसी (Varanasi) येथे एका पत्रकार परिषदेत काँग्रेस (Congress) पक्षावर शाब्दिक हल्ला चढवत राहुल गांधी (Rahul Gandhi) व प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर टीकास्त्र सोडली आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल यांचा अमेठी मधून स्मृती इराणी यांच्या विरुद्ध पराभव झाला , वास्तविक अमेठी (Amethi) हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात असताना राहुल यांचा पराभव धक्कादायक होता. याच विषयाला धरून आज आठवले यांनी राहुल गांधी यांना साधी पक्षाची जबाबदारी सांभाळता आली नाही तर मग देश कसा चालवणार आहेत असा सवाल केला. तर दुरीकडे प्रियांका गांधी या सरकारवर वारंवार टिपण्या करत आहेत मात्र त्या केंद्रापर्यंत पोहचण्याआधीच भरकटल्या जात आहेत असेही आठवले म्हणाले.

रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणूकीच्या वेळी अनेकदा काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांवर अशा प्रकारची झोड घेतली होती, पाच वर्षे चांगली कामे करून सुद्धा आजही विरोधी पक्ष व काही जण हे वारंवार मोदी सरकारची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांच्यापैकी कोणालाच हे शक्य झालेले नाही, उलट लोकांनीच की मोदी शिवाय पर्याय नाही हे दाखवून दिले आहे, असे देखील आठवले म्हणाले.

ANI ट्विट

दरम्यान, उत्तर प्रदेश हा लोकसभेच्या 40 व विधानसभेच्या 403 मतदारसंघांचा प्रदेश आहे, त्याठिकाणची जनसंख्या बघता मागील काही काळापासून राज्याचे दोन भाग व्हावेत अशी मागणी होती. यालाच समर्थन देत आज पूर्वांचल हा अलिप्त प्रदेश ठरवून वाराणसीला राजधानी करण्यात यावे अशीही मागणी आठवले यांनी केली. दुसरीकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून २१ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार आहे, तत्पूर्वी महाराष्ट्रात 10 जागांवर निवडणूक लढवण्यासाठी आठवले यांचे प्रयत्न सुरु आहेत.