अयोध्येतील राम मंदिर भाविकांसाठी 2023 पर्यंत खुले होण्याची शक्यता-सूत्र
Ram Mandir (Photo Credits: Twitter)

अयोध्येतील राम मंदिर भक्तांसाठी डिसेंबर 2023 पर्यंत खुलण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान रामल्लांचे दर्शन आता देशभरातील भाविकांना घेता येणार आहे. मंदिर निर्माण पूर्ण होईल किंवा नाही पण गर्भगृह जरुर तयार केला जाणार आहे. उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यानंतर 2024 मध्ये लोकसभा निवडणूका पार पडणार आहेत. त्यापूर्वीच राममंदिर भाविकांसाठी पूर्ण करत भाजप कडून त्याचे श्रेय घेतले जाऊ शकते. दरम्यान, राममंदिराचे बांधकाम हे अयोध्येत मोठ्या जोरात सुरु आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षात केले होते.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 2023 च्या अंतपर्यंत देशभरातील सर्व भक्तांना रामल्लांचे दर्शन घेता येणार आहेत. निर्धारित वेळ 2025 पर्यंत पूर्ण 67 एकरवर मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल. तसेच आता 110 एकरचे एक पूर्ण मंदिर कॉम्पेल्स सुद्धा असणार आहे. संपूर्ण राममंदिराच्या उभारणीसाठी 900-1000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.(Tokyo Olympics 2020: यावेळी ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक खेळाडूंनी कठीण टक्कर दिली आहे म्हणत पंतप्रधानांनी वाढवलं खेळाडूंचे मनोबल, ट्विट करत व्यक्त केल्या भावना)

तेथे म्युझियम, आर्काइव आणि एक लहान रिसर्ज सेंटर तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रशानिक ब्लॉक, गेस्ट हाउस, संत, प्रसाद तयार करणारे आणि वितरण संस्था असणार आहे. या मंदिराचा इतिहास असा असणार आहे की, किती देशांमध्ये रामायण लिहिले गेले आहे. राम नवमीच्या दिवशी सूर्यची किरणे थेट रामल्लांवर पडतील याचा प्रयत्न केला जात आहे.