Ram Mandir, Ayodhya (Credits: Twitter)

रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या (Ram Mandir) उभारणीसाठी अडथळा येऊ लागला आहे. कारण मंदिराचा पायासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीची चाचणी अशयसव्वी ठरली आहे. जमिनीत पिलर टाकण्यासाठी समस्या येत आहे. राममंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी असे म्हटले की, आयआयटी इंजिनिअरिंग संस्था आणि निर्मिती करणऱ्या कंपन्यांच्या विशेषज्ञांसोबत बातचीत सुरु आहे. चंपत राय यांच्यानुसार, टेस्ट पाइल्स (खांब) हे 125 फूट खोल ठेवले गेले आणि 28 दिवसानंतर 700 टन वजनासह भुकंपाचे झटके देत त्याचे परिक्षण केले गेले. मात्र त्याचे परिणाम हवे तसे आले नाहीत त्यामुळेच काम थांबले.

अडथळ्यांबद्दल बोलताना त्यांनी असे म्हटले की, पश्चिमेच्या बाजूने पाण्याचा प्रवाह आहे. जेथून सरयू नदीच्या येथे अभयारण्य तयार केले जाणार आहे. 17 मीटर खोल अशी घट्ट माती नसल्याने भुसभुशीत माती मिळत आहे. जी पाया रचण्यासाठी अडथळा आणत आहे.(Ayodhya Ram Mandir: 'राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही' राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला) 

राय यांनी म्हटले की मद्रास,बॉम्बे, गुवाहाटी आणि सूरतचे आयटीआय विशेषज्ञांनी सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इंस्टिट्युट (CBRI) रुडकी, टाटा, लार्सन अॅन्ड टर्बो आणि मंदिर प्रोजेक्ट मॅनेजर जगदीश यावर चर्चा करत आहेत की कशा पद्धतीने वॉटर इनफ्लो पासून सूटका मिळेल.(अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीसाठी VHP देशभर राबवणार मोहिम; राम भक्तांकडून घेतली जाणार देणगी)

त्यांनी पुढे असे ही म्हटले की, जमिनीच्या खालील संभाव्य पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी राम मंदिराच्या आसपास असलेल्या जमिनीच्या खाली एक रिटेनिंग वॉल तयार केली जाईल. मंदिराच्या पायाचे काम जानेवारी आता पु्न्हा सुरु केले जाणार आहे. कारण विविध आयटीआय आणि इंजिनिअरिंग संस्थांच्या विशेषज्ञांकडून एक रिपोर्ट तयार केला जात आहे.