Ram Vilas Vedanti l (Photo Credit- Twitter)

राम जन्मभूमी (Ram Janmabhoomi) न्यासाचे ज्येष्ठ सदस्य डॉ. रामविलास वेदांती यांनी राम मंदिर (Ram Mandir Ayodhya) उभारणीबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. राम मंदिर उभारण्यासाठी येत्या वर्षभरात अध्यादेश निघेल. तसेच, 2024 पर्यंत राम मंदिर बांधून पूर्ण होईल, असे विधान डॉ. रामविलास वेदांती (Ram Vilas Vedanti) यांनी केले आहे. अयोध्या येथे आज राम मंदिर उभारणीच्या मुद्द्यावर साधू संतांची बैठक पार पडत आहे. या बैठकीपूर्वी डॉ. वेधांती यांनी हे विधान केले आहे.

दरम्यान, आपल्या वक्तव्याच्या माध्यमातून रामविलास वेदांती यांनी दावा केला आहे की, केंद्र सरकारला 2020 मध्ये राज्यसभेमध्ये बहुमत मिळेल. हबे बहुमत मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधून कलम 270 हटविण्यात येईल. तर दुसऱ्या टप्प्यात सरकार कलम 35 (अ) हटवेन. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात गैरविवादित जमीन सरकार राजन्मभूमी न्यासाकडे परत करेन. वेदांती यांनी केलेल्या वक्तव्यानुसार केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जमीन परत करण्याबाबत या आधीच याचिका दाखल केली आहे. वेदांती यांनी असेही म्हटले आहे की, ही जमीन मिळाल्यानंतर चौथ्या टप्प्यात 2024 मध्ये केंद्र सरकार राम मंदिराची उभारणी करण्याची प्रक्रिया सुरु करेन. (हेही वाचा, राम मंदिर मुद्द्यावर आरएसएस, विहिंप यांच्याकडून अंगचोरक्या सुरू: शिवसेना)

अयोध्या येथील मणिराम दास छावणी येथे आयोजित राम मंदिर मुद्द्यावर श्री राम जन्मभूमी न्यासाची बैठक आज पार पडत आहे. या बैठकीत विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी सहभागी होण्याची शक्यता आहे. न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक दुपारी 3 वाजल्यापासून पार पडत आहे. यात बैठकीत राम मंदिराच्या मुद्द्यासोबतच कलम 370 आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबतही चर्चा केली जाणार असल्याचे सममजते.