मारहाण । प्रतिकात्मक फोटो । (Photo Credits: IANS)

राजस्थान (Rajasthan) मधील नागौर (Nagaur) जिल्ह्यातील पांचौडी पोलिस स्टेशन परिसरामध्ये दोन तरूणांना क्रुरपणे मारहाण करून, गुप्तांगामध्ये पेट्रोल टाकल्याची जुनी घटना समोर आली आहे. या घटनेच्या सहा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. दरम्यान यानंतर बुधवारी (19 फेब्रुवारी) सात अरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवार झाली असली तरीही या प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करण्यासाठी तीन दिवसांचा म्हणजे बुधवार पर्यंतचा वेळ गेला.

पोलिसांकडून संबंधित आरोपींवर सेक्शन 323, 143,342 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मोतीनाथपुरा निवासी भीवसिंह, सोननगर निवासी आईदान लछमण सिंह, रामसर निवासी जसूसिंह, मोतीनाथपुरा निवासी सवाईसिंह, हड़मासिंह, करनू निवासी गणपतराम यांचा समावेश आहे. यांच्यावर अमानवीयपद्धतीने मारपीट आणि गुप्तांगामध्ये पेट्रोल टाकण्याचे आरोप लावण्यात आले आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पीडितांशी संपर्क करून पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्य दोघांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान 50,000 रूपयांच्या चोरीचा आरोप असलेल्या दोन तरूणांना या 7 जणांनी विकृतपणे मारहाण केली आहे. या प्रकरणामध्ये कोणतीही अटक अद्याप झालेली नाही. सोशल मीडियात मॉब लिंचिंग सारख्या घटनांवर चाप बसण्यासाठी 3 महिन्यात येणार नवे नियम.  

सोननगर भोजावास येथे राहणार्‍या तरूणाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते 16 फेब्रुवारी दिवशी मोटारसायकला सर्विस करण्यासाठी चुलत भावासोबत गावातील एजेंसीमध्ये गेले होते. दरम्यान यावेळेस काऊंटरवर चोरीचा आरोप लावत एजेंसीच्या मागे रबरच्या बेल्ट आणि लाथा बुक्क्यांनी मारलं. त्यानंतर पेट्रोलने भिजवलेला कपडा गुप्तांगामध्ये घातला. त्यानंतर त्याला गंभीर स्वरूपाची जखम झाली. सुमारे दीड तासांच्या मारहाणीनंतर पीडितांनी त्यांच्या शेजार्‍यांकडे मदत मागितली. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित तरूणाला रूग्णालयात दाखल केले.