Human Trafficking: वय वर्षे 38 असलेल्या व्यक्तीसोबत विवाह करण्यासाठी एका कुटुंबाने चक्क आपल्या 7 वर्षे वयाच्या मुलीची विक्कीर केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. ही घटना राजस्थान (Rajasthan) राज्यातील धौलपूर (Dholpur District) येथे घडल्याचे वृत्तसंस्था 'पीटीआय'ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. धक्कादायक म्हणजे कुटुंबाने पीडितेला साडेचार (4.5) लाख रुपयांना विकल्याचे या वृत्तात म्हटले आहे. धौलपूर येथील राहणार्या भूपाल सिंह (वय वर्षे 38) याच्या कुटुंबाने साडेचार लाख रुपयांची किंमत ठरवून मुलीला तिच्या वडीलांकडून विकत घेतले. या मुलीसोबत भूपाल याने 21 मे रोजी कथीतपणे विवाह केला. हा विवाह धौलपूर येथील मनिया भागात घडली. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलीसांनी घटनेचा तपास केला.
पोलीस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील एका खुनाच्या गुन्हात एका कुटुंबातील काही सदस्य तुरुंगात राहिले. त्यानंतर संशयीताचे कुटुंब गाव सोडून उतरनिर्वाहासाठी या गावात स्थायिक झाल्याचे पुढे आले. (हेही वाचा, Crime: पालकांनी 12 वर्षीय मुलीचे दोनदा लावले लग्न, गर्भवती राहिल्यावर घटना आली उघडकिस)
धोलपूरचे पोलिस अधीक्षक मनोज कुमार यांनी सांगितले की, मुलीला विकत घेऊन एका मध्यमवयीन व्यक्तीशी लग्न केल्याची माहिती पोलिसांना मंगळवारी मिळाली. प्राप्त माहितीनुसार, मनियाचे पोलीस उपअधीक्षक दीपक खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भूपाल सिंगच्या घरावर छापा टाकला. जिथून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्या आले. पोलिसांनी तिला मुलीला ताब्यात घेतले तेव्हा तिने हातावर आणि घोट्यावर मेंदी लावली होती. विवाह केल्या जाणाऱ्या विधिच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या तपासात सिंगच्या कुटुंबीयांनी मुलीला 4.50 लाख रुपये देऊन तिच्या वडिलांना विकत घेतल्याची कबुली दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या कृत्यात कोण आणि किती लोक सामील आहेत याची माहिती गोळा करण्यात येत असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.