Rajasthan Assembly Elections 2018: मतदानानंतर राजस्थानच्या रस्त्यावर सापडले 2 मतदान यंत्र
राजस्थानमध्ये रस्त्यावर सापडले मतदान यंत्र (Photo credits: ANI)

Rajasthan Assembly Elections 2018: देशभरात विधानसभा निवडणूका सुरु असून कालच राजस्थानमध्ये निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आज रस्त्यावर दोन मतदान यंत्र सापडल्याचे धक्कादायक वृत्त समोर येत आहे. राजस्थानमधील बारन जिल्ह्यातील किशनगंज विधानसभा मतदारसंघातील शाहाबाद परिसरात हा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणी दोन निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. हे ही वाचा:  Rajasthan Assembly Elections 2018 Exit Poll: राजस्थानमध्ये जनादेश काँग्रेसच्या बाजूने, भाजप सत्तेतून पायऊतार होण्याची शक्यता

या गंभीर प्रकारबद्दल निवडणूक आयोगातील अब्दुल रफीक आणि नवल सिंह पटवारी या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. रस्त्यावर सापडलेल्या या मतदान यंत्राचा वापर झाला होता का? हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राजस्थानमध्ये 199 जागांसाठी 2274 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. तर 15 व्या विधानसभा निवडणूकीसाठी एकूण 200 पैकी 199 जागांसाठी मतदान झालं राज्यात एकूण 4,74,37,761 मतदार असून यामध्ये 2,47,22,365 पुरुष आणि 2,27,15,396 महिला मतदार आहेत. यापैकी युवा मतदारांची संख्या 20,20,156 आहे.