डिजिटल पोर्नोग्राफी (Digital Pornography) म्हणजेच अश्लील चित्रफिती बनवून मोबाईल अॅपच्या माध्यमातून प्रसारीत करण्याच्या आरोपाखाली उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी नुकतीच अटक केली. हे राज कुंद्रा हे बहुचर्चीत उद्योगपती असून त्यांची विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचे पुढे आले आहे. प्राप्त माहितीनुसार, उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) जवळपास नऊ कंपन्यांचे संचालक (डायरेक्टर) आहेत. या पैकी आर्म्सप्राइम मीडिया (Armsprime Media) ही कंपनी सध्या गाजत असलेल्या वादग्रस्त प्रकरणात चर्चेत आहे. या कंपनीचे संजय कुमार त्रिपाठी आणि सौरभ कुशवाह असे दोन संचालक आहेत. आर्म्सप्राइम मीडिया प्राइवेट लिमिटेड ही कंपनी फेब्रुवारी 2019 मध्ये स्थापन करण्यात आलेली एक खासगी कंपनी आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, मुंबई येथे एक बिगरशासकीय कंपनी म्हणून या कंपनीचे वर्गीकरण आहे. कंपनीची अधिकृत भागभांडवल गुंतवणूक 10 लाख रुपये इतकी आहे. ही कंपनी खेळ आणि मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे.
आर्म्सप्राइम मीडिया प्राइवेट लिमिटेड कंपनीची वार्षीक सर्वसाधारण बैठक (MGM) पाठीमागील वर्षी 25 सप्टेंबर 2019 मध्ये झाली होती. कॉर्पोरेट मंत्रालयाच्या माहितीनुसार कंपनीची शेवटची बॅलन्स शिट 31 मार्च 2019 मध्ये दाखल करण्यात आली. कंपनीच्या संचालक पैकी संजय त्रिपाठी हे इनवेस्को एसेट मैनेजमेंट इंडिया, स्पार्टेक व्हेंचर्स, ट्रॅवक्सो टेक्नॉलॉजीज, एगिलियो डिजिटल सोल्यूशंस आणि एगिलियो लॅब्स चे संचालकही आहेत.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती असलेले राज कुंद्रा उर्फ रिपू सूदन कुंद्रा नऊ कंपन्यांच्या संचालक पदावर सूचीत आहेत. तर शिल्पा योग प्रायव्हेट लिमिटेड ची संचालक आहेत. या कंपनीला लोक शिल्पा शेट्टी यांच्या नावानेच ओळखतात.
राज कुंद्रा संचालक असलेल्या कंपन्या
सिनेमेशन मीडिया वर्क्स, बास्टियन हॉस्पिटैलिटी, कुंद्रा कंस्ट्रक्शन, जेएल स्ट्रीम, एक्वा एनर्जी बेवरेजेज, वियान इंडस्ट्रीज, होल अँड देम सम प्राइवेट लिमिटेड आणि क्लियरकॉम प्राइवेट मीडिया इ.
राज कुंद्रा आणि शिल्पा हे दोघेही कुंद्रा कंस्ट्रक्शन मध्ये संचालक होते. परंतू, कंपनी आता आपल्या भूमिकेतून बाहेर पडली आहे. शिल्पा शेट्टी कुंद्रा या 23 कंपन्यांमध्ये संचालक आहेत. परंतू त्यातील अनेक कंपन्यांमधून आता त्या आपल्या पदावरुन बाजूला झाल्या आहेत.