यंदाच्या वर्षात कमी पावसाची शक्यता, स्कायमेट हवामान खात्याचा अंदाज
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

यंदा देशात सर्व साधारण पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट या हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच कमी पावसामुळे शेतकऱ्यांना या फटका बसण्याची सुद्धा शक्यता आहे. तर पीकांवर परिणाम झाल्यास महागाईत वाढ होणार आहे.

स्कायमेटने दर्शवलेल्या अंदाजानुसार, सरासरी पाऊस यंदा 93 टक्के पडण्याची शक्यता आहे, तसेच पाऊस कमी पडल्यास पीकांवर परिणाम आणि कर्जामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांवर सुद्धा परिणाम होणार आहे. यामुळे आर्थिक स्थितीसह महागाई वाढण्याची शक्यता आहे. सरासरी पाऊस 90 ते 95 टक्के म्हणजे सर्वसाधारणापेक्षा कमी श्रेणीमध्ये असल्याचे मानले जाते.(हेही वाचा-भारतीय रेल्वे प्रशासनाने भंगार विकून केली करोडो रुपयांची कमाई)

अल-निनोचा प्रभाव हे कमी पाऊस पडण्यामागील मुख्य कारण असल्याचे स्कायमेटचे सीईओ जतीन सिंह यांनी म्हटले आहे. यापूर्वी सर्वसाधारण 55 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र या वर्षी पाऊस सामान्य राहणार असल्याचे स्कायमेटने सांगितले आहे.