RAIL ROKO Andolan: शेतकऱ्यांकडून आज रेल रोको आंदोलन, 6 तासापर्यंत ट्रेन थांबवण्याची घोषणा
Rail Roko Andolan (Photo Credits-ANI)

RAIL ROKO Andolan: शेतकऱ्यांकडून आज 6 तासापर्यंत रेल रोको आंदोलन केले जाणार आहे. त्यानुसार सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत देशात विविध ठिकाणी ट्रेन थांबवण्याची घोषणा करण्यात आली आहे. दिल्ली आणि एनसीआर मध्ये मुसळधार पाऊस असला तरीही शेतकऱ्यांकडून हे आंदोलन केले जात आहे. संयुक्त किसान मोर्चा यांनी घोषणा केली आहे की, हे आंदोलन शांतिपूर्ण पद्धतीने केले जाणार आहे. त्याचसोबत बंदच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या आवश्यक आणि आपत्कालीन सेवांना अडथळा येऊ देणार नाही.

शेतकऱ्यांनी लखमीपुर खैरी येथील हिंसाचाराच्या घटनेवरुन आणि त्या प्रकरणी गृह राज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे रेल रोको आंदोलनाची घोषणा केली होती. यापूर्वी शेतकऱ्यांच्या नेत्यांनी लखमीपुर खैरी येथील हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली होती. यामध्ये काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह विविध पक्षातील नेत्यांनी उपस्थिती लावली होती. लखमीपुर खैरी प्रकरणात अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा याला आरोपी ठरवले जात असून त्याला अटक करण्यात आली आहे. परंतु शेतकऱ्यांकडून अजय मिश्राच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.(Chhattisgarh Shocker: दुर्गा विसर्जनासाठी जाणाऱ्या लोकांना वेगवान कारने चिरडले; पहा धक्कादायक घटनेचा व्हिडिओ)

Tweet:

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान सिंघु बॉर्डरवर कथित रुपात निहंग शीखद्वारे करण्यात आलेल्या एका तरुणाच्या हत्येचे प्रकरण सुद्धा चर्चेत आहे. या घटनेवर चहूबाजूंनी संताप व्यक्त केला जात आहे. सिंघु बॉर्डर आणि दिल्लीतील अन्य रस्ते खाली करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने असे म्हटले की, असे निषेध अनिश्चित काळासाठी समर्थनीय असू शकत नाहीत.