Rahul Gandhi On Modi Government Over Adani: हिंडनबर्ग रिपोर्ट आणि अदानी मुद्द्यांवरु राहुल गांधी आक्रमक;  मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार
Rahul Gandhi | (Photo Credits: ANI)

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावादरम्यान केंद्र सरकारवर जोदार हल्ला चढवला. भारत जोडो यात्रे (Bharat Jodo Yatra) दरम्यान आलेल्या अनुभवांचा दाखला देत राहुल गांधी यांनी हिंडनबर्ग रिपोर्ट (Hindenburg Research Report), गौतम अदानी (Rahul Gandhi Over Adani) देशातील महागाई, बेरोजगारी (Unemployment) आणि इतर अनेक मुद्द्यांवरुन केंद्र सरकारला घेरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणीत एनडीए सरकारच्या मंत्री आणि सत्ताधारी सदस्यांनी राहुल गांधी यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकसभा सदस्य ओम बिरला यांनी राहुल गांधी यांना पूर्ण वेळ बोलू दिले. त्याचा फायदा घेत राहुल गांधी यांनी चौफेर फटकेबाजी केली. आपल्या संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान लोकसभेत म्हटले की, नुकत्याच संपलेल्या 'भारत जोडो यात्रे'मध्ये लोक महागाई, बेरोजगारी आणि त्यांना भेडसावणाऱ्या इतर समस्यांबद्दल बोलत होते. हिंडनबर्ग रिपोर्टवरुन अदानी यांच्याबद्दल बोल होते. देशात इतके महत्त्वाचे मुद्दे असतानाही राष्ट्रपतींच्या अभिभाषणात 'बेरोजगारी'चा उल्लेख नव्हता. राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये महागाईचा उल्लेख नसावा याबद्दल राहुल गांधी यांनी काहीसे आश्चर्यही व्यक्त केले. (हेही वाचा, Rahul Gandhi On Adani Row: पंतप्रधान मोदी अदानींवर चर्चा न करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील, राहुल गांधींची टीका)

ट्विट

हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेच्या अहवालाचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले, लोकांना मोदी-अदानी संबंधांबद्दल जाणून घ्यायचे आहे. अदानींच्या कंपन्यांनासाठी नियमांकडे दुर्लक्ष केले गेले. कायदे बदलून कमे देण्यात आली. महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळपासून ते हिमाचल प्रदेशपर्यंत आपण सर्वत्र 'अदानी' हे एकच नाव ऐकत आलो आहोत. संपूर्ण देशात फक्त 'अदानी', 'अदानी', 'अदानी' आहे... लोक मला विचारायचे की अदानी कुठेही प्रवेश करतात. त्यांना नेहमी फायदा होतो. कधीही त्यांना अपयश येत नाही. त्यांच्या यशाचे राज काय आहे? तरुणांनी आम्हाला विचारले की अदानी आता 8-10 क्षेत्रात आहेL आणि 2014 ते 2022 पर्यंत त्यांची एकूण संपत्ती 8 अब्ज डॉलर्सवरून 140 अब्ज डॉलर्स कशी झाली? अदानी विदेशात जातात फक्त त्यांच्याच कंपन्यांना कंत्राटे मिळतात. अदानी यांचे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत नाते काय आहे? अदानी यांच्यासाठी सरकार विशेष सवलती देते का?, असे अनेक प्रश्न राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केले आहेत.

ट्विट

राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवरुन बोलताना म्हटले की, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. यात अग्निवीर योजनेबद्दल काहीच उल्लेखनाही. केवळ एका ठिकाणी आम्ही ही योजना सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. लोक सांगतात की, अग्निवीर योजना आरएसएसकडून आली आहे. लोकांना अग्निवीर योजना नको आहे. लष्करालाही ती नको आहे. मग ही योजना हवी कोणाला आहे? सरकारच्या अशा धोरणांमुळे जनता त्रस्त आहे, असे म्हणत वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी निशाणा साधला.