Rahul Gandhi On No-Confidence Motion Video: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या लोकसभा सभागृहात भाषण सुरु केले आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजपला जोरदार टोला लगावला. पाठमागच्या वेळी मी भाषणात काहीसा आक्रमक झालो होतो. मी अदानी मुद्द्यावरुन (No-Confidence Motion) काही प्रश्न विचारले होते. ज्यामुळे सत्ताधारी मंडळींना बरेच दु:ख झाले, कष्ट झाले. पण, घाबरु नका. या वेळी मी तेवढा आक्रमक होणार नाही. मी अदानी मुद्द्यावर बोलणार नाही. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. राहुल गांधी यांच्या या विधानावर सभागृहात सत्ताधारी खासदार काहीसे आक्रमक झाले. त्यांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी सर्वांना अवाहन करताच सभागृह नियंत्रणात आले.
एकदोन मारेन पण तेवढेच मारेन- राहुल गांधी
राहुल गांधी यांनी या वेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांचे आभारही मानले. तसेच, माफीही मागीतली. ते म्हणाले मागच्या वेळी मी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आपणास कष्ट झाले. त्याबद्दल मी आपली माफी मागतो. त्यावेळी मी अदानीच्या मुद्दा घेतल्याने सत्ताधारी वर्गाला बराच धक्का बसला. पण आज मी तसे काही करणार नाही. त्यामुळे आपणास कष्ट होतील अशा मुद्द्यावर फार बोलणार नाही. बोलताना काही मी एकदोन मारेन. पण फार नाही. तेवढेच मारेन असेही ते म्हणाले. तसेच, लोकसभा सभागृहात पुन्हा संधी दिल्याबद्दल त्यांनी अध्यक्षांचे आभारही मानले. लोकसभेमध्ये ते अविश्वास प्रस्ताव विषयावर बोलत होते.
व्हिडिओ
BJP के मित्रों, डरो मत।
इस बार मेरा भाषण अडानी पर नहीं है।
: संसद में @RahulGandhi जी pic.twitter.com/WVfShcyjnI
— Congress (@INCIndia) August 9, 2023
हृदयापासून बोललेले हृदयापर्यंत पोहोचते
आज मी सभागृहात बोलण्यासाठी उभा आहे कारण मला माहिती आहे हृदयापासून बोललेले हृदयापर्यंत पोहोचते. मला वाटते आज मी जे काही बोलेन ते आपल्याही (सत्ताधारी) हृदयापर्यंत पोहोचेल. भारत जोडो यात्रेमध्ये मी जेव्हा देश समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझा अहंकार पूर्ण गळून पडला. मला देशातील नागरिकांची वेदना समजू लागली. त्यांच्या हृदयातील आवाज माझ्यापर्यंत पोहोचू लागला.