
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस (Congress Party) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शनिवारी आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 (International Women’s Day 2025) वर महत्त्वाचे भाष्य केले. जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगताना त्यांनी समाजातील महिलांचे स्थान आणि त्यांची कामगिरी याबाबत कौतुकोद्गार काढले. तसेच, महिलांना "समाजाचा कणा" म्हणून गौरवले आणि देशाचे भविष्य घडवण्यात त्यांची भूमिका अधोरेखित केली. त्यांनी सोशल मीडिया एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरुन आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, भारताच्या उभारणीत महिलांचे महत्त्वाचे योगदान आहे. आपल्या समाजाचा त्या कणा आहेत. त्यांची शक्ती, लवचिकता आणि आवाज आपल्या देशाचे भविष्य घडवतात.
लिंगसमानतेबद्दलच्या वचनबद्धतेची पुष्टी
राहुल गांधी यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत लिंगसमानतेबद्दलच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. त्यांनी म्हटले की, या आंतरराष्ट्रीय महिला दिनी, मी तुमच्यासोबत आणि तुमच्यासाठी उभा आहे - जोपर्यंत प्रत्येक महिला स्वतःचे नशीब घडवू शकत नाही, प्रत्येक स्वप्नाचा पाठलाग करू शकत नाही आणि अधिक उंचीवर पोहोचू शकत नाही तोपर्यंत, प्रत्येक अडथळा तोडण्यासाठी वचनबद्ध आहे. महिला दिनाच्या शुभेच्छा!” (हेही वाचा, Mumbai-Sainagar Shirdi Vande Bharat Train: मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेनचे महिलांकडून संचलन; आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम)
राष्ट्र उभारणीत महिलांच्या अतुलनीय सहभाग
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनीही आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि राष्ट्राला बळकटी देण्यासाठी विविध क्षेत्रात महिलांच्या सहभागाची आवश्यकता अधोरेखित केली. सोशल मीडिया एक्स (पूर्वीचे ट्विटर) देशभरातील आपल्या सर्व बहिणींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा. स्वातंत्र्यलढ्यापासून ते राष्ट्र उभारणीपर्यंत, महिलांनी नेहमीच प्रत्येक क्षेत्रात भाग घेतला आहे आणि त्यांच्या शक्तिशाली नेतृत्व क्षमता सिद्ध केल्या आहेत. आज, महिलांची भूमिका आणि सहभाग आणखी वाढवण्याची गरज आहे. जितक्या जास्त महिला पुढे येतील तितकाच देश अधिक शक्तिशाली आणि सुंदर होईल. (हेही वाचा, International Women’s Day 2025 Google Doodle: गूगल डूडल साजरा करतंय आंतरराष्ट्रीय महिला दिन)
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या शब्दांचा हवाला देत त्यांच्या शुभेच्छा दिल्या: जागे व्हा, उठा आणि शिक्षित करा. परंपरा तोडून टाका. मुक्त करा, असे ते म्हणाले. खर्गे यांनी अधोरेखित केले की, महिलांचे ज्ञान, समर्पण आणि शक्ती त्यांना सामाजिक परिवर्तनाचे शक्तिशाली घटक बनवते, राष्ट्रीय प्रगतीमध्ये लिंग समानतेची आवश्यकता बळकट करते. 'राष्ट्रीय परिवर्तनाची सुरुवात लिंग समानतेने होते. महिला त्यांच्या बुद्धी, समर्पण आणि सामर्थ्याच्या माध्यमातून समाजाला आकार देण्याचे शक्तिशाली घटक आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२५ च्या शुभेच्छा!, असेही ते सोशल मीडिया मंच एक्स (जुने ट्विटर) वर म्हणाले.