Kiss | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

ओडिशा (Odisha ) राज्यातून एक धक्कादायक प्रकार पुढे येतो आहे. रॅगींग (Ragging ) प्रकारात मोडणारी ही घटना सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून जोरदार चर्चीली जात आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ओडिशा राज्यातील महाविद्यालयात नव्या असलेल्या एका विद्यार्थ्याला अल्पवयीन मुलीचे चुंबन जबरदस्तीने (Forced Kiss) घ्यायला भाग पाडण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर दोन अल्पवयीन मुलांसह पाच विद्यार्थ्यांना लैंगक छळ, छेडछाड आणि इतर काही आरोपांखाली ताब्यात घेण्यात आले आहे.

गंजम जिल्ह्यातील (Ganjam District) महाविद्यालयाने या घटनेत सहभागी असलेल्या 12 विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून काढले आहे. या महिन्याच्या (नोव्हेंबर) सुरुवातीला हैदराबादच्या एका महाविद्यालयात एका फ्रेशरचे शारीरिक शोषण होताना दिसल्यानंतरची ही ताजी घटना आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. (हेही वाचा, Health Benefits of Kissing: निरोगी शरीरासह आरोग्यासाठी फायदेशीर आहे 'चुंबन'; जाणून घ्या फायदे)

प्राप्त माहितीनुसार, सरकारी महाविद्यालयात एका अल्पवयीन मुलाने प्रवेश घेतला. विद्यालयाच्या पहिल्या वर्षातील या अल्पवयीन विद्यार्थ्याला त्याच्या वरिष्ठांनी (सीनिअर स्टुडंट) भडकावले. तसेच, मैदानातील एका अल्पवयीन मुलीला चुंबन घेण्यास भाग पाडले. त्यातून या मुलाने मैदानात जबरदस्तीने चुंबन घेतले, असे व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. पीडित विद्यार्थीनी निघण्यासाठी उभी असताना एका वर विद्यार्थ्याने तिला थांबवण्यासाठी तिचा हात धरला.