Rafale Deal:राफेल प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार, केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का
The Supreme Court of India | File Image | (Photo Credits: PTI)

Rafale Deal: राफेल कराराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला असून या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यामध्ये राफेल प्रकरणी सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवरील आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभुमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय भाजपसाठी (BJP) धक्कादायक असल्याचे म्हटले जात आहे..

राफेल खरेदी वरुन विरोधकांकडून या प्रकरणी घोटाळा झाला असल्याचे वारंवार म्हटले जात होते. त्यामुळे यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात याबद्दल याचिका दाखल केली होती. तसेच खरेदी संदर्भातील पुरावे चोरी झाल्याची माहितीसुद्धा न्यायालयाला देण्यात आली होती.(हेही वाचा-Rafale Deal: राफेल प्रकरणातील कागदपत्रे चोरीला; सर्वोच्च न्यायालयात सरकारने दिली माहिती म्हणाले 'चौकशी आहे सुरु')

सुनावणी दरम्यान न्यायालयाने कागदपत्रांवरील आक्षेप मान्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राफेल प्रकरणी सुनवणी होणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात आला आहे. तर फ्रान्स मधील द सॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून भारताने 36 राफेल विमानांची खरेदी केली. परंतु ही खरेदी अधिक दराने केली असून त्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोपसुद्धा अनेकांनी यापूर्वी म्हटले होते.