Blast (Image used for representational purpose only) (Photo Credits: PTI)

शुक्रवारी पाकिस्तानमधील क्वेटाच्या सॅटेलाईट टाऊन भागात मशिदीत स्फोट झाला असून एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह 15 जण मरण झाले आहेत, अशी माहिती पोलिस आणि अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेत सॅटेलाईट टाऊन मधील प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या घूसबाद भागात असलेल्या या मशिदीत 20 जण जखमी झाले.

स्फोटात प्राण गमावलेल्या व्यक्तींमध्ये पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) अमानुल्लाही होते, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले, अशी माहिती बचाव अधिकाऱ्यांनी दिली. डीएसपी अमानुल्ला यांना पोलिस प्रशिक्षण महाविद्यालय सरियाब रोड येथे तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, महिन्याभरापूर्वी गोळीबारात त्या अधिकाऱ्यांचा मुलगा शहीद झाला होता.

गृहमंत्री मीर झियाउल्लाह लांगोव यांनी या स्फोटाचा निषेध करत म्हणाले, "पाकिस्तान आणि बलूचिस्तानमधील शत्रू शांतता प्रस्थापित करतांना दिसत नाहीत परंतु सरकार आपल्या जनतेचे रक्षण करण्यात अबाधित राहील."

लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा म्हणाले की, पाकिस्तान सैन्य पोलिस आणि नागरी प्रशासनास संपूर्ण सहकार्य देईल, असे डीजी आयएसपीआर मेजर जनरल आसिफ घफूर यांनी एका ट्वीटद्वारे सांगितले.

डीजी आयएसपीआरने सीओएएसचा संदेश दिला आणि उद्धृत केले की, “ज्यांनी मशिदीत निर्दोष लोकांना लक्ष्य केले ते कधीच खरे मुस्लिम असू शकत नाहीत.”

सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, फ्रंटियर कॉर्प्सचे जवान स्फोटस्थळी पोहोचले.

दरम्यान, प्रथम निष्कर्षांवरून असे सुचविण्यात आले आहे की दुचाकीवर स्फोटक सामग्री बसविण्यात आली होती. स्फोटात जवळील दुकाने नष्ट झाली आणि जवळच उभ्या असलेल्या मोटारसायकलला भीषण आग लागली.