गौतम गंभीर (Photo Credit: IANS)

कोविड-19 (COVID-19) प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी नागरिकांनी स्वत: जनता कर्फ्यू (Janta Curfew) पाळण्याचे आवाहन केले. प्रधानमंत्री मोदी यांच्या कर्फ्यूच्या हाकेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. देशभरातील रस्ते आणि बाजारपेठा निर्जन असल्याचे दिसून आले. असे असतानाही गेल्या 24 तासांत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढून आता 427 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र कोरोनाचे सर्वाधिक 89 रुग्ण आढळून आले असून संपूर्ण देशभर याचा परिणाम वेगाने वाढत असल्याने महाराष्ट्रासह 22 राज्य आणि 80 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आलं आहे. जीवनावश्यक सेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्याचे निर्देश आता केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत. असे असतानाही या लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं आज पाहायला मिळालं. अशा स्थितीत भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने अशा लोकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. (Coronavirus: लॉकडाउनची परिस्थिती नागरिकांनी गांभीर्याने घेण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागरिकांना आवाहन)

गंभीरने एक कठोर शब्दांद्वारे संदेश पाठविला आहे ज्यायोगे समाजात सतत धोका निर्माण करणाऱ्या उपद्रविंविरूद्ध कठोर कारवाई करावी असे आवाहन केले. ‘तुम्हीही जाल आणि आपल्या कुटूंबालाही घेऊन जाल! क्वारंटाइन किंवा जेल! संपूर्ण समाजासाठी धोका बानू नका आणि घरीच रहा! लढाई नोकरी  आणि व्यवसायाची नसून जीवनाची आहे! जे अत्यावश्यक सेवा प्रदान करतात त्यांना त्रास होऊ नये. लॉकडाऊनचे अनुसरण करा !! जय हिंद, ’गंभीरने ट्विटरवर लिहिले.

सोमवारी कोविड-19 संक्रमित लोकांची संख्या 400 पार गेल्याने केंद्र सरकारने राज्यांना कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विविध शहरांमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यास सांगितले आहे. राज्य सरकारांना दिलेल्या चिठ्ठीमध्ये केंद्राने त्यांना लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आहे.