नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानी राखी बहीण कमर मोहसिन शेख यंदाही मोदींसोबत साजरा करणार रक्षाबंधनाचा सण; दीर्घायुष्यासाठी केली प्रार्थना
Qamar Mohsin Shaikh, PM Modi Rakhi Sister | (Photo Credits: ANI)

देशभरात आज (15 ऑगस्ट) 73 व्या स्वातंत्र्य दिनासोबत रक्षाबंधनाचादेखील सण आहे. या सणाचं औचित्य साधून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आज लाल किल्ल्यावर भाषण केल्यानंतर त्यांची बहीण कमर मोहसिन शेख (Qamar Mohsin Shaikh) यांच्यासोबत रक्षा बंधनाचा सण साजरा करण्यासाठी खास वेळ राखून ठेवला आहे. कमर या मूळच्या पाकिस्तानी आहेत. मात्र मागील 30 वर्षापासून त्या हमखास राखी पौर्णिमेचा सण साजरा करतात. Raksha Bandhan 2019 Muhurat: रक्षाबंधन साजरं करण्याचा यंदा शुभ मुहूर्त कोणता? 19 वर्षांनी जुळून आलाय हा खास योग

आज ANI या वृत्त संस्थेशी बोलताना, कमर यांनी नरेंद्र मोदी यांच्या पुढील 5 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या सकारात्मक निर्णयातून जगाच्या कानाकोपर्‍यात त्यांची ओळख पोहचावी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच मोदींच्या निरोगी आरोग्यासाठी देखील त्यांनी प्रार्थना केली आहे.

ANI Tweet 

कमर मोहसिन शेख या लग्नापूर्वीपर्यंत पाकिस्तानमध्ये राहत होत्या. त्यानंतर त्यांचे भारतीय व्यक्तीशी लग्न झालं. संघाचे प्रचारक असताना विविध भागांना भेटी देताना त्यांची गाठ शेख परिवाराशी झाली. तेव्हापासून दरवर्षी कमर शेख मोदींना राखी बांधतात. सध्या हे कुटुंब अहमदाबादमध्ये राहतात. नरेंद्र मोदी कमर शेख यांच्यासोबत वृंदावन येथील विधवा महिलांसोबतही राखी पौर्णिमेचा सण साजरा करतात.