Aadhar Card: जर तुम्हाला एटीएम सारखे आधार कार्ड हवे असेल तर एकाच क्रमांकावरुन आता ते बनवता येणार आहे. त्याचसोबत तुमचा मोबाईल क्रमांक सुद्धा आधार कार्डला लिंक नसेल तरीही तुम्हाला PVC स्वरुपातील आधार कार्ड तुमच्या घरी येणार आहे. गेल्या वर्षात UIDAI यांनी ऑक्टोंबर महिन्यात PVC कार्ड लॉन्च केले होते. ते एका एटीएम कार्ड सारखेच दिसते. त्यानंतर आता युआयडीएआयने एक नवी सुविधा सुरु केली आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट ही केले असून आपल्या आधार कार्डवरील नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशिवाय वेरिफिकेशनसाठी कोणत्याही मोबाईल क्रमांकावर ओटीपी उपलब्ध करुन घेऊ शकता. त्यामुळे एकाच व्यक्तिच्या क्रमांकावरुन संपूर्ण परिवाराचे पीवीसी रुपातील आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर करु शकता.
सध्याच्या नियमानुसार आधार कार्ड मध्ये नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाणार आहे. परंतु युडीआयएआय यांनी आता रजिस्टर नसलेल्या मोबाईल क्रमांकासाठी सुद्धा ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे परिवारातील कोणत्याही सदस्याला पीवीसी आधार कार्ड बनवता येणार आहे.(Aadhaar Card ला लिंक केलेला मोबाईल नंबर नेमका कोणता? हे जाणून घेण्यासाठी uidai.gov.in वर फॉलो करा या स्टेप्स!)
>>घरबसल्या 'या' पद्धतीने तयार करता येईल आधार कार्ड
-नवे पीवीसी आधार कार्डसाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळाला प्रथम भेट द्यावी लागणार आहे.
-तेथे गेल्यानंतर My Aadhar या सेक्शनमध्ये जाऊन ऑर्डर आधार पीवीसीवर क्लिक करावे.
-त्यानंतर तुम्हाला तुमचा 12 किंवा 16 डिजिटचा वर्च्युअल आयडी किंवा 28 डिजिटचा आधार एनरॉलमेंट आयडी द्यावा लागणार आहे.
-आता सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा कोड भरुन ओटीपी मिळवण्यासाठी Send OTP वर क्लिक करा.
-त्यानंतर रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी आल्यानंतर तो तुम्हाला द्यावा लागणार आहे.
-असे केल्यानंतर आधार पीवीसी कार्डचा प्रिव्हू तुम्हाला पाहता येणार आहे.
-त्यानंतर खाली दिलेल्या Payment या ऑप्शनवर क्लिक करा.
-पीवीसी आधार कार्डसाठी तुम्हाल 50 रुपये शुल्क मोजावे लागणार आहे.
-पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमच्या पीवीसी आधार कार्डची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
-ही प्रक्रिया केल्यानंतर UIDAIतुम्हाला पाच दिवसातच आधार कार्ड प्रिंट करुन पोस्टात जमा करणार आहे. त्यानंतरच स्पीड पोस्टच्या माध्यमातून तुमच्या घरी पीवीसी आधार कार्ड मिळणार आहे.
पीवीसी आधार कार्ड हे अगदी एटीएम कार्ड सारखे दिसणार आहे. त्यामुळे ते तुम्ही कुठेही आणि कधीही घेऊन जाऊ शकता. तसेच जरी तुम्ही पावसात भिजलात तरीही ते खराब होण्याची चिंता नाही. तुम्हाला तुमचे आधार कार्ड आता ऑनलाईन पद्धतीने घरी मागवता येणार आहे.
-