Representational Picture (photo credit- File image)

Punjab Shocker, कामगाराचे अपहरण, अपहरण, बलात्कार, Rape, जालंधर, Jalandhar, Punjab, Factory Worker,पंजाबमधील (Punjab) जालंधर (Jalandhar) शहरात अपहरणाची (Kidnapping) धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लेदर कॉम्प्लेक्समधील कारखान्यात काम करणाऱ्या एका व्यक्तीने दावा केला आहे की, चार मुलींनी त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला बेशुद्ध करून कारमधून पळवून नेले. यानंतर चारही महिलांनी त्याला गुंगीचे औषध व दारू पाजून त्याच्यावर बलात्कार (Rape) केला. त्यानंतर सकाळी त्याला तसेच रस्त्यावर सोडून मुली पळून गेल्या.

आता तरूणाने मीडियासमोर आपल्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार कथन केला आहे. लाजेमुळे आपण अद्याप पोलिसांत तक्रार केलेली नाही, असेही त्याने सांगितले. ही व्यक्ती विवाहित आहे व त्याला मुलेही आहेत. घरी परतल्यावर त्याने घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला, मात्र कुटुंबीयांनी त्याला पोलिसात तक्रार दाखल न करण्याचा सल्ला दिला. लैंगिक अत्याचाराच्या हेतूने आपले अपहरण केल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे.

त्याने सांगितले की, तो कारखान्यात मजूर म्हणून काम करतो. रविवारी कारखान्यातून घरी जात असताना कपूरथला रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची कार त्याच्याजवळ येऊन थांबली. कारमध्ये 4 मुली बसल्या होत्या, ज्यांचे वय सुमारे 22-23 वर्षे होते. या मुलींनी त्याला एक पत्ता विचारला. ही व्यक्ती पत्ता समजावून सांगत असताना मुलींनी त्याला बेशुद्ध करून जबरदस्तीने आपल्या गाडीत बसवले. कारमध्ये त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली आणि त्याचे हातही पाठीमागे बांधले गेले. (हेही वाचा: Pregnant Dog Killed: गर्भवती कुत्रीची हत्या, विकृत हास्य करत आरोपींचे कृत्य; दिल्ली येथे चौघांना अटक)

यानंतर मुलींनी त्याला अज्ञात ठिकाणी नेले. तेथे त्याला ड्रग्ज देण्यात आले, तसेच दारूही पाजली गेली. यानंतर चारही मुलींनी त्याच्यावर बलात्कार केला. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास डोळ्यावर पट्टी बांधून आणि हाताला बांधून त्याला लेदर कॉम्प्लेक्समध्ये टाकून त्या निघून गेल्या. व्यक्तीने सांगितले की, मुली चांगल्या कुटुंबातील असल्याचे दिसत होत्या. सर्वजण आपापसात इंग्रजीत बोलत होत्या. दरम्यान, ठाणे बस्ती बावा स्पोर्ट्सचे प्रभारी गगनदीप सिंह सेखोन यांनी सांगितले की, सध्या कोणाच्याही बाजूने पोलिसांकडे तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल.