पुणे शहरात (Pune News) मध्यरात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात पार्टी सुरू असणाऱ्या हॉटेलवर कारवाई (Pune Hotels) करण्यात आली आहे. पुणे शहरात रात्री 1.30 वाजेनंतर देखील 'आफ्टर पार्टीज्' सुरु असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील तब्बल 10 नामांकित हॉटेल्सवर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. शहरातील हॉटेल, पब, बारमध्ये उशीरापर्यंत पार्टी सुरू असल्याच्या तक्रारी गुन्हे शाखेकडे आल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणे, मद्य परवानाचे रजिस्टर न भरणे आणि विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पुण्यातील तब्बल 10 नामांकित हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. दहा हॉटेल आणि पबवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मागील आठ दिवसात पुण्यातील दहा हॉटेल्स आणि पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.
- प्लंज, कोरेगाव पार्क
- लोकल गॅस्ट्रो बार
- एलरो
- युनिकॉर्न
- आर्यन बार, बालेवाडी
- नारंग वेंचर
- हॉटेल मेट्रो
- लेमन ग्रास, विमाननगर
- बॉलर
- हॉटेल काकाज
या दहा हॉटेल आणि पबवर कारवाई ही करण्यात आली असून या हॉटेलमध्ये रात्री एक नंतरही पार्टी ही सुरु असल्याचे आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.