पुण्यामध्ये आज (25 ऑगस्ट) सकाळी हडपसरआणि वाघोली या भागात अग्नितांडव पहायला मिळाला आहे. या आगीमध्ये जीवितहानीचे नुकसान नसले तरीही त्यामध्ये लाखोंचा माल जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. हंडेवाडी परिसरात प्लॅस्टिकच्या गोदामाला आग लागली आहे. तर वाघोली येथे वाहनांच्या स्पेअरपार्ट्सच्या दुकानाला आग लागली आहे. या आगींवर अग्निशमन दलाने तात्काळ नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या या भागात कुलिंग़ ऑपरेशन सुरू आहे.
वाघोली येथील मारूती सुझुकीच्या सर्व्हिस सेंटरला रात्री उशिरा आग लागली होती. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र झपाट्याने पसरत गेलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे 2 तासांनंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. वाघेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या मारूती सुझूकीच्या साई सर्व्हिस स्टेशनला आग लागली. या आगीमधून गाड्या बाहेर काढण्यात आल्या आहेत मात्र स्पेअर पार्ट जळून खाक झाले आहेत.
पुण्यामधील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.