Pulitzer Prize 2022: दानिश सिद्दीकी यांच्यासह 3 भारतीय पत्रकारांना पुरस्कार पुलित्झर पुरस्कार
Pulitzer Prize 2022 | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लेखन, नाटक, संगीत इतर विविध क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या मानाच्या पुलित्झर पुरस्कार 2022 (Pulitzer Prize 2022) ची घोषणा झाली आहे. जागतिक पातळीवर अत्यंत गौरवाचा समजला जाणारा हा पुरस्कार यांदा 4 भारतीयांना मिळाला आहे. यात रॉयटर्सचे दिवंगत पत्रकार दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांच्यासह आबिदी (Adnan Abidi), सना इरशाद मट्टू (Sana Irshad Mattoo), अमित दवे (Amit Dave) या तीन भारतीयांचा समावेश आहे. युक्रेनच्या पत्रकारांनाही विशेष प्रशिस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले.

पुलित्जर पुरस्कार विजेत्यांमध्ये सार्वजनिक सेवेसाठी वॉशिग्टन पोस्टला सन्मानित करण्यात आले. हा सन्मान 6 जानेवारी 2021 मध्ये झालेल्या हल्ल्यात निभावलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरी बद्दल देण्यात आला. फ्लोरिडा समुद्र किनारपट्टीवर अपार्टमेंट टॉवर कोसळताना केलेल्या वार्तांकनाबद्दल मियामी हेराल्डच्या कर्मचाऱ्यांना ब्रेकींग न्यूज बद्दल, टैम्पा बे टाईम्सच्या कोरी जी. जॉनसन, रेबेका वूलिंगटन आणि एली मरे यांनी फ्लोरिडा येथील एमकेव बॅटरी रीसायक्लिंग प्लांटमध्ये इत्यंत विषारी धोक्यांना सर्वांसमोर आणले. त्यामुळे शेकडो श्रमीक आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यासाठी उपाययोजनांसाठी सरकारला भाग पाडले याबाबद्दल विशेष संशोधन पुरस्काराने या टीमला गौरविण्यात आले. तर राष्ट्रीय वार्तांकनासाठी द न्यूयॉर्क टाइम्सच्या कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय वार्तांकनासाठी द न्यूयॉर्क टाईम्सलाच गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट फीचर लेखनाचा पुरस्कार द अटलांटिक च्या जेनिफर सीनियरला देण्यात आला. (हेही वाचा, Danish Siddique: भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानात हत्या)

पुलित्झर विजेत्या भारतीय मान्यवरांमध्ये अदनान अबिदी, सना इर्शाद मट्टू, अमित दवे या भारतीय पत्रकारांच्या नावांचा समावेश आहे. तर रॉयटर्सचे दिवंगत दानिश सिद्दीकी यांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला आहे. तालिबान आणि अफगाण लष्कर यांच्यातील संघर्षादरम्यान ते मारले गेले. अदनान अबिदी, सन्ना इर्शाद मट्टू आणि अमित दवे यांनाही त्यांनी केलेल्या अभूतपूर्व कामासाठी गौरविण्यात आले.