बहुप्रतिक्षित प्रो कबड्डी लीग 2024 (Pro Kabaddi League 2024) हंगाम शुक्रवार, 18 ऑक्टोबर रोजी हैदराबादच्या गाचीबावली इनडोअर स्टेडियमवर सुरू होत आहे. या हंगामात एकूण 132 साखळी सामने खेळले जातील. त्यात पाच प्लेऑफ सामन्यांचा समावेश असेल. या हंगामातील सर्व सामने हैदराबाद, नोएडा आणि पुणे या तीन ठिकाणी खेळले जातील. पीकेएल सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक (PKL 2024 Schedule) आपण येथे पाहू शकता. हे सामने क्रीडाप्रेमी आणि कबड्डीचाहत्यांसाठी रोमांचक ठरु शकतात.
पीकेएल 2024 चे स्वरूप आणि ठिकाणेः
पीकेएल 2024 हंगाम तीन टप्प्यांमध्ये पार पडेल. स्पर्धेचा पहिला टप्पा हैदराबादमध्ये, दुसरा टप्पा नोएडामध्ये आणि तिसरा टप्पा पुण्यात होणार आहे. सहभागी होणाऱ्या 12 संघांपैकी प्रत्येक संघ इतर अकरा संघांविरुद्ध दोन सामने खेळेल, ज्यात अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळवतील. तिसऱ्या आणि सहाव्या स्थानांदरम्यान असलेले संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी एलिमिनेटर सामन्यांमध्ये भाग घेतील. उपांत्य फेरीतील विजेते प्रतिष्ठित पी. के. एल. चषक उंचावण्यासाठी ग्रँड फिनालेमध्ये भिडतील. (हेही वाचा, Pro Kabaddi League: प्रो कबड्डी लीग, बंगळुरु बुल्स संघातील अव्वल खेळाडू)
PKL 2024 पूर्ण वेळापत्रक (गट टप्पा)
प्रो कबड्डी लीग 2024 च्या गट टप्प्याचे संपूर्ण वेळापत्रक खाली दिले आहेः
- बेंगळुरू बुल्स विरुद्ध तेलुगू टायटन्स
दिनांकः 18 ऑक्टोबर 2024 वेळः 08:00 PM IST
ठिकाणः गाचीबावली इनडोअर स्टेडियम, हैदराबाद (Leg 1)
- दबंग दिल्ली विरुद्ध यू मुंबा
दिनांकः 18 ऑक्टोबर 2024
वेळः सकाळी 09:00 वाजता
ठिकाणः गाचीबावली इनडोअर स्टेडियम, हैदराबाद (Leg 1)
- तेलुगू टायटन्स विरुद्ध तामिळ थलायवाज
दिनांकः 19 ऑक्टोबर 2024 वेळः 08:00 PM IST
ठिकाणः गाचीबावली इनडोअर स्टेडियम, हैदराबाद (Leg 1)
- पुणेरी पलटण विरुद्ध हरियाणा स्टीलर्स
दिनांकः 19 ऑक्टोबर 2024 वेळः 09:00 PM IST
ठिकाणः गाचीबावली इनडोअर स्टेडियम, हैदराबाद (Leg 1)
- बंगाल वॉरिअर्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स
दिनांकः 20 ऑक्टोबर 2024
वेळः सकाळी 08:00 वाजता
ठिकाणः गाचीबावली इनडोअर स्टेडियम, हैदराबाद (Leg 1)
- गुजरात जायंट्स विरुद्ध बंगळुरू बुल्स
दिनांकः 20 ऑक्टोबर 2024 वेळः 09:00 PM IST
ठिकाणः गाचीबावली इनडोअर स्टेडियम, हैदराबाद (Leg 1)
लीग जसजशी पुढे जाईल तसतसे नोएडा आणि पुणे येथे सामने खेळले जातील. त्यामुळे कबड्डी चाहते या सामन्यांवर आणि विजयांवर लक्ष ठेऊ शकतात.
प्लेऑफ संरचनाः
- साखळी फेरीतील अव्वल दोन संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
- तिसऱ्या ते सहाव्या स्थानावरील संघ एलिमिनेटर सामन्यांमध्ये सहभागी होतील.
- पी. के. एल. 2024 चा विजेता ठरवण्यासाठी उपांत्य फेरीतील विजेते अंतिम सामन्यात आमनेसामने येतील.
प्रो कबड्डी लीग (PKL) ही भारतातील एक व्यावसायिक कबड्डी स्पर्धा आहे. जी 2014 मध्ये स्थापन झाली. ती क्रिकेटमधील इंडियन प्रीमियर लीग (IPL) प्रमाणेच फ्रँचायझी-आधारित मॉडेलचे अनुकरण करते.