दक्षिण दिल्लीतील एका सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याबाबत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थ्याच्या वर्गातील मुलांनी त्याचे गुप्तांग (Private Part) धाग्याने घट्ट बांधल्या प्रकार पुढे आला आहे. पीडित मुलगा किडवई (Kidwai Nagar) अटल आदर्श नामक शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे. दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त चंदन चौधरी यांनी सांगितले की, पीडित मुलाला अंघोळ घालताना त्याच्या पालकांना हा धागा आढळून आला. त्यांतर या घटनेचा उलघडा झाला. ही घटना 28 डिसेंबर रोजी उघडकीस आली.
आयएनएस वृत्तसंस्थेने पोलिसांचा हवाला देत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पालक पीडित मुलाला घेऊन रुग्णालयात गेले. रुग्णालयातून पोलिस नियंत्रण कक्षाला (पीसीआर) माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक रुग्णालयात दाखल झाले. (हेही वाचा, Nandurbar: मस्करी अंगाशी आली! तरुणाच्या प्रायवेट पार्टमध्ये एअर कॉम्प्रेशर मशीनने हवा भरल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू)
ट्विट
New Delhi: Students of a government school in South Delhi tied the private part of an eight year-old fellow classmate with a thread.@DelhiPolice
— IANS (@ians_india) December 31, 2022
पीडित मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत. घटेनेतील सर्व आरोपी हे अल्पवयीन असल्याचे समजते. दरम्यान, पोलिसांचे एक पथक शाळेत जाऊन आरोपींची ओळख पटवणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. प्रकरणाचा तपास अद्यापही सुरुच असून, लवकरच सविस्तर माहितीची प्रतिक्षा आहे.