Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

कुणाचीही मजाक करताना ती कशी, कधी करायची याचं भान कायम असायला हवं. कारण हिचं मस्करी बरेचदा अंगाशी येतानाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. पण या प्रकरणात तर एक छोट्याश्या मस्करीने चक्क एक तरुणाचा जीव घेतला आहे. तरी मस्करी करताना ती जपून, सांभाळून आणि मर्यादेत करावी. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील छडवेल कोर्डे येथील एका कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तुषार निकुंभ असे मृत तरुणाचे नाव आहे. तरी या तरुणाचा मृत्यू केवळ एका चेष्टेमुळे झाला आहे. कंपनीत काम करत असताना तुषारसह त्याने काही सहकारी काम करत होते. काम आटोपल्यावर ते कंपनीतचं मजामस्ती करु लागले. तर अशीची मस्करी करताना एअर कॉम्प्रेशर मशीनने तुषारच्या मित्रांनी त्याच्या गुदद्वारात हवा भरली.

 

काही वेळ त्यांना हा सगळा प्रकार थट्टा मस्करी वाटू लागला पण बघता बघता तुषारची प्रकृती अचानक खालावली आणि त्याला नंदुरबारमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तुषारची प्रकृती आणखीच खालवल्याने त्याला तातडीने सुरतच्या रुग्णालयात दाकल करण्यात आले. तुषारवर उपचार करण्याचे प्रयत्न केले पण दुर्दैवाने तुषारचा मृत्यू झाला. तरी संबंधीत प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे ही वाचा:- Molestation in Moving Car Case: मुंबई-अहमदाबाद हायवेवर 10 महिन्याच्या मुलीला गाडीबाहेर फेकत चालत्या कार मध्ये महिलेचा विनयभंग)

 

मित्रांनी आपआपसात केलेली मजामस्करी तरुणाच्या जीवावर बेतली आहे. तरी तुषारच्या अशा अचानक जाण्याने निकुंभ कुटुंबात शोकाकुळ पसरला आहे. तर तुषारच्या सहकारी मित्रांना देखील त्यांच्या कृत्याचा मोठा पश्चाताप होत आहे. तरी पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. हा केवळ अपघात हे की ठरवून केलेला घातपात या प्रकरणी पोलिस चौकशी करीत आहेत.