Molestation in Moving Car Case: मुंबई-अहमदाबाद हायवेवर 10 महिन्याच्या मुलीला गाडीबाहेर फेकत चालत्या कार मध्ये महिलेचा विनयभंग

Vijay Kushwaha या कार चालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

Molestation in Moving Car Case: मुंबई-अहमदाबाद हायवेवर 10 महिन्याच्या मुलीला गाडीबाहेर फेकत चालत्या कार मध्ये महिलेचा विनयभंग
Molestation | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई-अहमदाबाद हायवेवर (Mumbai Ahmedabad National Highway) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चालत्या गाडीमधून 10 महिन्यांच्या मुलीला बाहेर फेकत महिलेसोबत विनयभंग (Molestation) करण्याचा प्रयत्न कार चालकाने केला आहे. दरम्यान या घटनेमध्ये त्या चिमुरडीचा मृत्यू झाला असून महिला रूग्णालयात भरती करण्यात आली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून Vijay Kushwaha ला अटक केली आहे. त्याच्यावर कलम 304, 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार फाटा जवळ ही घटना घडली आहे. दुपारच्यावेळेस ही महिला आपल्या लेकीसह पतीला भेटण्यासाठी जात होती. त्यावेळी कारमधील नराधमाने विनयभंग केला. गाडीतून लहान मुलीला बाहेर फेकून दिले. हा प्रकार पाहून महिलेही गाडीबाहेर उडी घेतली त्यामध्ये तिला जबर दुखापत झाली आहे. सध्या हॉस्पिटल मध्ये तिच्यावर उपचार सुरू असून मुलीचा मृत्यू झाला आहे. Mumbai Shocker: खार परिसरामध्ये 17 वर्षीय मुलीवर 'Intimate Photo' प्रसिद्ध करेन या धमकीखाली समवयस्कर मुलाकडून अनेकदा बलात्कार; आरोपी अटकेत .

महिला वाडा तालुक्यातील पिंपलास गावामधील राहणारी होती. तर पती नालासोपारा मध्ये पेल्हार मध्ये एका कंपनीत काम करत होता. त्याला भेटण्यासाठीच ती जात असताना हा प्रकार घडला आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पीडीतीने मीडीयाला दिलेल्या माहितीमध्ये तिला  सतत गाडी चालक हात लावत होता.

(The above story first appeared on LatestLY on Dec 11, 2022 09:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).