Prince of Wale प्रिन्स चार्ल्स (Prince Charles) हे म्हणजेच नोव्हेंबर मध्ये 13 व 14 तारखेला भारत दौऱ्यासाठी (India Tour) येणार असल्याचे युके मधील त्यांच्या कार्यलयाने सोमवारी सांगितले आहे. हा दौरा हा भारत- ब्रिटनचे (India- Britain) संबंध साजरे करत आणखीन दृढ करण्याच्या हेतूने पुरस्कृत असणार आहे. विशेष म्हणजे प्रिन्स चार्ल्स यांचा वाढदिवस सुद्धा 14 नोव्हेंबर रोजी असल्याने नवी दिल्ली (New Delhi) येथे मोठा कार्यक्रम आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय या दौऱ्याच्या निमित्ताने दोन्ही देशातील आर्थिक, सामाजिक, पर्यावरण, व वाढत्या बाजारक्षेत्राची गरज या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे समजत आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रिन्स चॉर्ल्स यंदा 14 नोव्हेंबर आपला 71 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. हा दिवस आणि भारत दौऱ्याचा कार्यक्रम एकाच दिवशी येत असल्याने हा वाढदिवस दिल्ली मध्ये साजरा करून मग दोन्ही देशांच्या संबंधावर चर्चा होणार आहे. भारत व ब्रिटनच्या एकत्रित संबंधांसाठी ही भेट फायदेशीर ठरू शकते.
ANI ट्विट
Prince Charles to visit India from November 13 to 14
Read @ANI Story | https://t.co/MMJC82OQUv pic.twitter.com/FfKWLPUlLW
— ANI Digital (@ani_digital) October 28, 2019
दरम्यान, प्रिन्स चार्लस हे राणी एलिझाबेथ II चे ज्येष्ठ पुत्र असल्याने ब्रिटनच्या राजघराण्यातील गादीचे पुढील वारस आहेत. या पदाचा आणि जबाबदारीचा मान ठेवण्यासाठी दरवर्षी प्रिन्स चार्ल्स अनेक देशांना भेट देत असतात. भारत दौऱ्याची 10 वी आणि प्रिन्स चार्ल्स यांची ही दुसरी खेप असणार आहे. यापूर्वी 10 दिवसीय आशियाई देशांच्या ट्रीप वर असताना प्रिन्स चार्ल्स यांनी भारताला सह परिवार भेट दिली होती तर त्यांच्या पत्नीने पाकिस्तान मधेय दौरा केला होता.