पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इस्कॉन मंदिरात 800 किलो भगवत गीतेचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इस्कॉन मंदिरात 800 किलो भगवत गीतेचे उद्घाटन (Photo Credits-Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज मंगळवारी (26 फेब्रुवारी) 670 पाने असलेल्या एका विशाल भगवत गीताचे (Bhagwat Gita) इस्कॉन मंदिरात उद्घाटन केले आहे. या भगवत गीतीचे वजन जवळजवळ 800 किलोग्रॅम आहे. तसेच भगवत गीता ही जगातिल सर्वात मोठा धार्मिक ग्रंथ असल्याचे मानले जाते. गीतेचे उद्घाटन केल्यानंतर मोदी यांनी एका कार्यक्रमाद्वरे जनतेला संबोधित केले आहे.

या कार्यक्रमादरम्यान मोदी यांनी गीतेचे महत्व पटवून देत असे म्हटले की, श्रीमंत असो वा गरीब जगातील कोणताही व्यक्ती ही भगवत गीता आपल्या घरी ठेवतो. या ग्रंथात आयुष्यातील चांगल्या गुणांचा पाठ यामधून दिला गेला आहे. त्याचसोबत कार्यक्रमात मोदी यांनी मानवतेच्या दुश्मनांपासून बचाव करण्यास देव नेहमीच देवाची शक्ती आपल्या सोबत असल्याचे बहुमोल वचन यावेळी त्यांनी सांगितले. याच वचानाचे पालन आम्ही आता दुष्ट लोकांसाठी उपयोगात आणत आहोत.

इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सियसनेस (ISKCON) हे हरे कृष्णा आंदोलनासाठी ही ओळखले जाते. या संस्थेची जगात 400 पेक्षा जास्त मंदिरे आहेत. इस्कॉन मंदिरात पोहचण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी मेट्रोमधून प्रवास करताना दिसून आले.