PM Modi | Twitter/ANI

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज इंडोनेशिया (Indonesia) मध्ये सुरू असलेल्या G20 Summit 2022 मध्ये सहभाग घेताना भारतीय समाजाकडून आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्येही सहभाग घेतला आहे. दरम्यान यावेळेस कार्यक्रमाला पोहचताना त्यांनी काही पारंपारिक वाद्य वादनाचा देखील आनंद लुटला. सोशल मीडीयामध्ये नरेंद्र मोदी बाली मध्ये पारंपारिक इंडोनेशियन वाद्य वाजवत असल्याचंही पहायला मिळालं आहे. ANI कडून जारी करण्यात व्हिडिओ मध्ये 2 पुरूष पारंपारिक वेशभूषेमध्ये आहेत आणि ते वाद्य वादन करताना दिसत आहेत.

पंतप्रधान मोदी हे कार्यक्रमाला जात असताना त्यांनाही या कलाकारांच्या वादन कलेची भुरळ पडली. ते थांबले आणि त्यांनीही काही क्षण या वादनाचा स्वतः आनंद लुटला. कलाकारांची भेट घेऊन ते पुढे कार्यक्रमाला गेले. नक्की वाचा: G-20 Summit: G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी बालीमध्ये पोहोचले, जंगी स्वागताचा व्हिडिओ व्हायरल .

पहा व्हिडिओ

बालीच्या समेट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान Rishi Sunak, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांचीदेखील भेट घेतली आहे. बाली मध्ये दाखल होताच विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भारतीयांनी पारंपारिक अंदाजात स्वागत केले. ही G20 शिखर परिषद देखील महत्त्वाची आहे कारण भारत 1 डिसेंबर 2022 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्षपद भूषवणार आहे आणि या बाली शिखर परिषदेदरम्यान अध्यक्षपदाचे हस्तांतरण होणार आहे.