Rahul Gandhi: 'अच्छे दिन देशावर भारी, पंतप्रधानांवर फक्त मित्रांचीच जबाबदारी', राहुल गांधी यांचे टीकास्त्र
Rahul Gandhi | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

देशातील वाढती महागाई, कोरोना व्हायरस महामारी (Coronavirus), बेरोजगारी आणि ढासळती अर्थव्यवस्था यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत असतात. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आजही (9 जुलै) ट्विटरवरुन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. हे टीकास्त्र सोडताना राहुल गांधी यांनी कॉंप्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) यांच्या वाढत्या किमतींवरुन निशाणा साधला आहे. हा निशाना साधताना राहुल गांधी यांनी 'अच्चे दिन देशावर भारी, पंतप्रधानांवर फक्त मित्रांचीच जबाबदारी' असा टोलाही लगावला आहे. राहुल गांधी हे पंतप्रधान मोदी आणि सरकारवर नेहमीच निशाणा साधत असतात.

राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकरारव हल्ला चढवत म्हटले आहे की, 'महागाईचा विचाकस जाही, अच्छे दिन देशावर भारी,पंतप्रधानांवर केवळ मित्रांची जबाबदारी'. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये #PNG #CNGPriceHike हा हॅशटॅगही वापरला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेल दरांनी आगोदर उच्चांग गाठला आहे. देशभरातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल, डिझेल प्रतिलीटर शंभरी पार गेले आहे. इंद्रप्रस्त ग्रस लिमीटेड (IGL) ने सीएनजी दरात प्रति किलो 90 पैशांची वाढ केली आहे. तर पीएनजी दरात दिल्लीमध्ये प्रतिलीटर 1.25 इतकी वाढ झाली आहे. (हेही वाचा, Rafale Deal: मोदी सरकार JPC चौकशीला का तयार नाही? राफेल विमान व्यवहारांवरुन राहुल गांधी यांचा सवाल)

राहुल गांधी ट्विट

एका बाजूला कोरोना व्हायरस महामारीमुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सदृश्य स्थिती आहे. दुसऱ्या बाजूला हातचे काम, रोजगार आणि नोकरी गेल्याने अनेकांसमोर जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच पेट्रोल डिझेलच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांवर मोठा भार पडला आहे. अनेकांचे आर्थिक गणीतच बिघडले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वेळीच जनभावना लक्षात घेऊन इंधनाचे दर कमी करावेत किंवा ते नियंत्रणात ठेवावेत अशी मागणी देशभरातून वाढते आहे. विरोधकही या मुद्द्यावर अनेक ठिकाणी मोर्चे काढत आहेत. आंदोलने करत आहेत.