पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी देशातील जनतेला विजयादशमी (Vijayadashami) अर्थातच दसरा (Dussehra) सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या या शुभेच्छांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजात दरी निर्माण करणाऱ्या सर्व शक्तींना दूर करण्याचे अवाहन जनतेला केले आहे. आज दसरा सणानिमित्त भारतभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. घराघरांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. दसरा सण हा सांस्कृती असला तरी, त्याला कौटुंबीक स्थानही मोठे आहे.
दरम्यान, आपल्या शुभेच्छा संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, 'आज विजयादशमीच्या दिवशी रावणदहनाची परंपरा आहे. हे रावण दहन परंपरेचा भाग आहे. परंतू, एक नागरिक म्हणून समाजात जी रावण प्रवृत्ती आहे. ती संपविण्यासाठी समाजात प्रत्येक नागरिकाने जागरुक राहायला हवे. कोणी कल्पना करु शकते अयोध्येतून वस्त्र परिधान करुन निघालेले राम पुढे संघटन शक्तीचे इतके मोठे कौशल्य सांगतील. लंगा विजयात त्यांच्यासोबत समाजातील प्रत्येक घटक जोडला गेला. समाजातील चांगल्या प्रवृत्तींना सोबत घेत प्रभू रामचंद्रांनी विजय मिळवला. परंतू, प्रभू रामचंद्रांनी विजयाचाही नम्रपणे स्वीकार केला. एक नागरिक म्हणून आपण समाजात दरी निर्माण करणाऱ्या सर्व शक्तींना दूर करायला हवे', असेही पंतप्रधान म्हणाले. (हेही वाचा, Happy Dussehra 2019 Images: दसरा व विजयादशमी च्या शुभेच्छा मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्विगुणित करा आनंद )
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट
विजयादशमी के पावन पर्व पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएं।
Greetings on the auspicious occasion of #VijayaDashami. pic.twitter.com/V0xjMuzUSL
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2019
राष्ट्रपती रामनाध कोविंद ट्विट
दशहरा पर्व पर देशवासियों को बधाई और शुभकामनाएं।
यह पर्व असत्य पर सत्य की विजय का उत्सव है। इस पर्व के माध्यम से हमें जीवन में ईमानदारी और सच्चाई के मार्ग पर चलने की प्रेरणा मिलती है।
मेरी कामना है कि यह त्योहार देश के लोगों के लिए खुशियां और समृद्धि लेकर आए
—राष्ट्रपति कोविन्द
— President of India (@rashtrapatibhvn) October 8, 2019
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही देशवासीयांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहे. ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या संदेशात रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे की, असत्यावर झालेल्या सत्याच्या विजयाचा हा उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून आम्हाला इमानदारी आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते. हा उत्सव देशवासीयांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन यावा या माझ्या सदिच्छा आहेत, असेही कोविंद यांनी म्हटले आहे.