Former President Pranab Mukherjee | File Image | (Photo Credits: PTI)

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी  (Pranab Mukherjee) यांची प्रकृती कालपासून खालावत आहे अशी माहिती दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटल (आर अँड आर) मधुन देण्यात आली आहे. फुफ्फुसातील संसर्गामुळे ते अजुनही सेप्टिक शॉक मध्ये आहेत. तज्ञांच्या टीमद्वारे त्यांंच्या तब्येतीचे बारकाईने निरिक्षण होत आहे, मात्र अजुनही ते डीप कोमात असुन त्यांंच्यावर व्हेंटिलेटर वर उपचार सुरु आहेत. प्रणब मुखर्जी हे मागील 21 दिवसांंपासुन हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत, मात्र त्यांंच्या प्रकृतीत सुधारणेची कोणतीही चिन्हे दिसत नाहीयेत, त्यांंचे मेडिकल, हेल्थ पॅरामीटर्स सुद्धा मध्यंंतरी अस्थिर झाले होते, हे पॅरामीटर्स सध्या जरी नियंंत्रणात असले तरी प्रणब मुखर्जी हे अजुनही नाजुक अवस्थेत आहेत. Amit Shah Discharged from AIIMS: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची Post Covid Care मध्ये प्रकृती सुधारल्यानंतर दिल्लीच्या एम्स मधून सुट्टी

दरम्यान मध्यंतरी एका प्रसिद्ध पत्रकाराने प्रणब मुखर्जी यांच्या निधनाचे ट्विट सुद्धा केले होते ज्यानंतर बराच गोंधळ झाला होता. मात्र प्रणब यांचे सुपुत्र अभिजीत मुखर्जी यांचे आणि मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी हे प्रणब मुखर्जी यांच्या प्रकृतीचे अपडेट्स देत असतात, त्यांनीच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

ANI ट्विट

प्रणब मुखर्जी यांंच्या तब्येतीबाबत आजवरची टाईम लाईन पाहिल्यास, 10 ऑगस्टला ब्रेन सर्जरी झाली होती तेव्हापासून प्रकृती खालावली असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांंना कोरोनाची सुद्धा लागण झाली होती.