देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Former President Pranab Mukherjee) यांंची प्रकृती अजुनही चिंंताजनक असल्याची माहिती दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटल (Army Hospital) मधुन समोर येत आहे. प्रणब मुखर्जी यांच्यावर अजुनही व्हेंटिलेटर वर उपचार सुरु आहेत. त्यांचे व्हायटल आणि क्लिनिकल पॅरामिटर्स स्थिर आहेत,तज्ञांद्वारे त्याच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. अशी माहिती आर्मी हॉस्पिटल तर्फे देण्यात आली आहे. मेंदूत गाठ झाल्याने 10 ऑगस्ट रोजी प्रणब मुखर्जी यांची ब्रेन सर्जरी पार पडली. दरम्यान त्यांची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तब्बल आठवड्याभर नंंतरही त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून आलेली नाही. (भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी haemodynamically stable; निधनाच्या फेक न्यूजनंतर मुलगा अभिजीत मुखर्जी यांची ट्विटद्वारे माहिती)
प्रणब मुखर्जी यांंनी स्वतःहुन आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट करुन दिली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्यांनी कोविड-19 ची चाचणी करुन घ्यावी आणि स्वतःला आयसोलेट करावे, असे आवाहनही त्यांनी केले होते.
ANI ट्विट
The condition of Pranab Mukherjee continues to be critical. His vital and clinical parameters are stable. He is on ventilatory support and is being closely monitored: Army Hospital (R&R), Delhi pic.twitter.com/9qVjAI8lsA
— ANI (@ANI) August 17, 2020
दरम्यान प्रणब मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी आणि मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी हे प्रकृतीचे अपडेट्स देत असतात. 13 ऑगस्ट ला प्रणब मुखर्जी यांच्या निधनाची खोटी बातमी समोर आली होती. त्यानंतर मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करुन वडीलांची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट केले होते.