Indira Gandhi International Airport | (Photo credit: archived, edited, representative image)

Delhi Airport Power Failure: दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport) सोमवारी दुपारी विद्युतपुरवठा अचानक खंडीत (Delhi Power Outage) झाला. जवळपास 45 मीनिटे उलटून गेली तरी तो पुर्ववत झालाच नाही. त्यामुळे बोर्डिंग आणि चेक-इन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला. या प्रकाराबद्दल प्रवाशांमध्ये नाराजी आणि संताप अशी संमिश्र भावना उमटत आहे. तर विमानतळ प्रशासन आणि एकूण यंत्रणेचाच कसा बोजवारा उडाला आहे याचेही चित्र पुढे आले नाही. विद्युतपुरवठा खंडीत झाल्याबत CNBC आणि TV 18 ने या वृत्तवाहिन्यांनी वृत्त दिले आहे.

दिल्ली विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवासी

दिल्ली हे राष्ट्रीय राजधानीचे शहर आहे. या ठिकाणाहून देश आणि जगभरातील प्रवासी प्रवास करतात. परिणामी हा परिसर नेहमीच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी गजबजलेला असतो. अशा स्थितीत अचानक विद्युत पुरवठा खंडीत होणे हे अतिशय गंभीर मानले जात आहे. दरम्यान, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची आणि विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय गैरसोय झाली. दरम्यान, या घटनेमुळे विस्कळीत झालेली सेवा पुन्हा पुर्ववत करण्यासाठी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळ प्रशासन अभूतपूर्व परिस्थितीचे करण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. (हेही वाचा, Air India: एअर इंडियाच्या प्रवाशाला त्याच्या जेवणात ब्लेड सापडले, एअरलाइनने जारी केले स्टेटमेंट)

एक्स पोस्ट

सोशल मीडियावरुन तक्रारींचा पाऊस

दरम्यान, अनेक प्रवाशांनी त्यांची निराशा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली. काहींनी एक्स (जुने ट्विटर) मंचावरुन आपल्या प्रतिक्रिया दिल्या. सोशल मीडियावरील, खास करुन एक्स माध्यमावरील अनेक वापरकर्त्यांच्या पोस्ट पाहिल्या तर लक्षात येते की, 3 (T3) विशेषत: प्रभावित झाले आहे, परिणामी गर्दी आणि गोंधळ उडाला आहे. (हेही वाचा, IGI Airport वर पुन्हा एकदा निष्काळजीपणा! 5 तास अडकले भुकेने आणि तहानलेले 200 प्रवासी)

विमानतळ प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम

दरम्यान, वीज खंडित झाल्यामुळे दिल्ली विमानतळाच्या तिन्ही टर्मिनलच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. टर्मिनल 1 आणि 2, प्रामुख्याने देशांतर्गत उड्डाणांसाठी वापरले जातात आणि टर्मिनल 3, जे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही उड्डाणे हाताळतात. या सर्वांमध्ये अडथळा पाहायला मिळत आहे. सुमारे 30 मिनिटे चाललेल्या या आउटेजमुळे विमानतळावरील सर्व कामकाज ठप्प झाले, त्यामुळे प्रवाशांना आणि विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या समस्या निर्माण झाल्या.

विमानतळ प्रशासनाकडून स्पष्टीकरण

दरम्यान, सोशल मीडियावरील वापरकर्त्यांच्या तक्रारींना प्रतिसाद म्हणून दिलेल्या प्रतिक्रियेत, दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL) म्हणाले की, "आम्ही आमच्या प्रवाशांना अशा प्रकारचा अनुभव देऊ इच्छित नाही. आम्ही आपल्या सर्व तक्रारी, सूचनांची नोंद घेतली आहे. आमची टीम संबंधीत समस्या आणि अडथळा दूर करण्याचे काम करत आहे. वीज पुनर्संचयित करण्याचे आणि सामान्य ऑपरेशन्स पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, विमानतळ अधिकारी उड्डाण वेळापत्रक आणि प्रवासी सेवांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी काम करत आहेत.

दरम्यन, @SidMalik28 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका वापरकर्त्याने T3 वरील गंभीर परिणाम ठळकपणे अधोरेखीत करताना म्हटले की, वीज खंडित होण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. विमानतळावर काहीच कार्यरत नव्हते, काउंटर बंद होते. तसेच, विद्युत सेवेवर अवलंबून असलेल्या इतर सेवाही ठप्प होत्या. @trainerrajeev या दुसऱ्या वापरकर्त्याने पोस्ट केले, "T3 IGIA वर 15 मिनिटांसाठी वीज गायब झाली. सर्व काउंटर आणि काम ठप्प झाले आहे." DIAL च्या X फीडवर तत्सम पोस्ट दिसल्या, ऑपरेटरने प्रतिसाद दिला की समस्या संबोधित केली जात आहे परंतु अधिक तपशील देत नाही.