प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

जन अधिकार पक्ष (Loktantrik) प्रमुख पप्पू यादव (Pappu Yadav) यांनी शनिवारी (3 सप्टेंबर) भाजप नेते आणि राज्यसभा खासदार आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. बिहारमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना पप्पू यादव यांनी भाजप नेत्यावर हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर पप्पू यादव भडकले व त्यांनी, 'श्रावणात नेते मंडळी पॉर्न व्हिडिओ पाहतात,’ असे वक्तव्य केले.

पत्रकाराने जनाधिकारी पक्षाचे प्रमुख पप्पू यादव यांना सुशील कुमार मोदी यांनी केलेल्या एका विधानावर प्रश्न विचारला. भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी आरोप केला होता की, बिहारमधील लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्व नेते श्रावण महिन्यात मांसाहार करतात. हे नेते श्रावण महिन्यात सर्व हिंदुविरोधी काम करतात, असेही भाजपने म्हटले असल्याचे या वार्ताहराने सांगितले.

पत्रकाराचा प्रश्न ऐकून पप्पू यादव भडकले व त्यांनी या प्रश्नाला रागाने उत्तर दिले. ते म्हणाले, ‘मानव जातीपेक्षा दुसरा मोठा कोणता नॉनव्हेज नाही. मानव अहंकारी, चरित्रहीन असतो. मानव चोरी-चकारी करतो, जातपात करतो, दुसऱ्या जातीच्या लोकांना कमी लेखतो, द्वेष पसरतो अशा प्रकारे सर्व वाईट कृत्य मानव करतो. नेते मंडळी श्रावण महिन्यात पॉर्न व्हिडिओ पाहणे सोडत नाहीत.’

ते पुढे म्हणाले, ‘श्रावण महिन्यात नेते मंडळी पॉर्न व्हिडिओ का पाहतात? ते नॉनव्हेज नाही का? आज या नेत्यांचे मोबाईल तपासा समजेल की श्रावण महिन्यात अनेकांनी पॉर्न व्हिडिओ पाहिले आहेत.’ (हेही वाचा: Viagra Overdose: व्हायग्रा गोळ्यांचा डबल डोस जीवावर बेतला, तरुणाचा Heart Attack ने मैत्रिणीसमोरच मृत्यू)

दरम्यान, राहुल गांधी आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव चंपारण मटण बनवत असल्याच्या व्हिडिओवर सुशील कुमार मोदींचे वक्तव्य आले होते. ते म्हणाले की, ‘हिंदु धर्म आणि सनातन धर्माला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षांच्या इंडिया गटाचा जन्म झाला आहे, जे श्रावण महिन्यात मांसाहार करतात.’