जयपूर: एखादी सरकारी मीटिंग म्हंटली की जे दृश्य डोळ्यासमोर यावं अगदी तश्याच प्रकारे जयपूर (Jaipur) मध्ये अन्न व नागरी पुरवठा (Food And civil Supply) विभागाची ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्स सोमवारी सुरु होती. मात्र चालू मीटिंगमध्ये पुढे जे घडलं ते पाहून सगळयांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ही मीटिंग व्हिडीओ कॉलच्या स्वरूपात सुरु होती त्या दरम्यान अचानक काही बटणं उलटसुलट दाबली गेल्याने स्क्रीनवर पॉर्नची क्लिप सुरु झाली. याबाबत सध्या पोलिसांना कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, मात्र यासाठी नक्की कोण जबाबदार आहे याचा अद्याप खुलासा झालेला नाही.
NDTV च्या माहितीनुसार, मुग्धा सिंग यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व नागरी पुरवठा विभागाची ऑनलाईन मीटिंग सुरु होती. या मीटिंग मध्ये येत्या काळात राबवण्याच्या योजनांबद्दल चर्चा सुरु होती. मीटिंगसाठी विभागीय ऑफिसमधील दहा कर्मचारी, एनआयसी चे काही प्रतिनिधी व तब्बल ३३ जिल्ह्यातील अधिकारी ऑनलाईन आले होते. मात्र मीटिंग सुरु असताना अचानक अश्लील पॉर्न व्हिडीओ सुरु झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यांनतर आपण त्वरित एनआयसीच्या अध्यक्षांना संपर्क करून याबाबत कठोर चौकशी करण्यास सांगितल्याचे मुग्धा यांनी म्हंटले आहे. चीनमध्ये IKEA मधील दुकानात अचानक सुरु झाली XXX क्लिप, पाहा व्हिडिओ
एनआयसीच्या चौकशीचा निकाल हाती येताच जो कोणी गुन्हेगार असेल त्याला कठोर शिक्षण सुनावण्यात येईल असे देखील मुग्धा यांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान असा प्रकार घडलेला हा काही पहिलाच प्रसंग नाही या आधी देखील भर मीटिंग मध्ये पोर्नचे व्हिडीओ लावण्याच्या गुन्ह्यात बीएसएफच्या एका जवानाला अटक करण्यात आले होते. हा प्रकार तांत्रिक गोंधळामुळे घडल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे मात्र यामुळे काही वेळासाठी मीटिंग मधील सर्वांचीच मान शरमेने खाली गेली हे मात्र खरं!