लग्नासाठी रजा नाकारल्याने पोलीस कर्मचा-याने वरिष्ठावर झाडल्या १३ गोळ्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

आसाम(Assam) राज्य सशस्त्र पोलीस दलाच्या कर्मचा-याने वरिष्ठावर आपल्या बंदुकीतून १३ गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात पोलीस उपनिरीक्षक भोलानाथ दास(Bholanath Das) यांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. लक्ष्मीकांत असे या (Laxmikant) पोलीस कर्मचा-याचे नाव असून तो २६ वर्षांचा आहे. येत्या २० मे ला त्याचा विवाह होणार होता.

लक्ष्मीकांत हा नैराश्यात होता. त्याची मनस्थिती चांगली नसल्याने त्याच्यावर उपचारही सुरू होते. रजा नाकारल्यामुळे त्याचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक भोलानाथ दास यांच्याशी वाद झाला. वादानंतर लक्ष्मीकांत याने थेट दास यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात दास यांचा जागीच मृत्यू झाला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल राजबंशी आणि शिपाई रोंतूमणी जखमी झाले आहेत.

ही घटना घडल्यानंतर लक्ष्मीकांत याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. लक्ष्मीकांत याला वैद्यकीय मदत दिली जाणार असून या प्रकरणी प्रशासकीय चौकशी करण्याचे आदेश हावडा जिल्हा दंडाधिकारी यांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी कांत यांचा सुटीवरून वरिष्ठाशी वाद झाला होता. लक्ष्मीकांतला लग्नासाठी एका आठवड्याची रजा हवी होती. मात्र त्याचा रजेचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी रजा नाकारल्याचे सांगण्यासाठी लक्ष्मीकांतला कार्यालयात बोलावण्यात आले. तेव्हा पासून लक्ष्मीकांतच्या मनात राग होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने तब्येत ठीक नसल्याचे कारण देत त्याने रुट मार्चसाठी जाणे टाळले. मात्र वरिष्ठांनी त्याचे मन वळवले. पुढील वेळेलाही लक्ष्मीकांत याने रुटमार्चसाठी येण्यास नकार दिला. त्यानंतर दास यांनी लक्ष्मीकांतला शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला. बलात्कार करताना अपयश, आरोपीने अल्पवयीन पीडितेला छतावरुन खाली फेकले

वरिष्ठ देत असलेल्या वागणुकीमुळे माझी मानसिक स्थिती बिघडली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप लक्ष्मीकांत याने केला. या प्रकरणी पोलीस कारवाई सुरू करण्यात आली आहे.