PM Ujjwala Yojana: पंतप्रधान उज्ज्वला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana) मोठा गाजावाजा करत लॉन्च करण्यात आली. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेबद्दल भरभरुन कौतुक केले होते. वास्तवात मात्र ही योजना भूईसपाट होताना दिसत आहे. सुरुवातीला नागरिकांनी या योजनेला भरभरुन प्रतिसाद देत नोंदणी केली. मात्र, एकूण नोंदणीपैकी जवळपास 4.13 कोटी लाभार्थ्यांनी दुसऱ्यांदा गॅस सिलिंडर मागवलाच नाही. त्यामुळे ग्राकांकडून उज्ज्वला योजना म्हणावी तितकी प्रभावी ठरलनी नसल्याचेच बोलले जात आहे. एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Gas Price) दर सातत्याने गगनाला भीडत असल्यानेच ग्राहकांनी हे उदासीनता दाखवली असल्याची चर्चा आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खडगे आणि काँग्रेस खासदार प्रमोद तीवारी यांनी केंद्र सरकारकडे उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांनी घेतलेल्या लाभाची आणि पाठिमागील पाच वर्षात एलपीजी गॅस सिलिंडर एक किंवा त्याहून कमी रिफील न करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येबाबत माहिती मागवली होती. या प्रश्नाला संसदेत उत्तर देताना केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी सांगितले की, पाठिमागील पाच वर्षांमध्ये 4.13 कोटी लाभार्थ्यांनी उज्ज्वला योजनेंतर्गत एकदाही सिलिंडर दुसऱ्यांदा मागवला नाही. पाठिमागील पाच वर्षांमध्ये 7.67 कोटी लाभार्थ्यांनी केवळ एकदाच एलपीजी सिलिंडर मागवला आहे. (वाचा - Railwire Sathi Kiosk Service: रेल्वेने सुरू केली खास सुविधा; आता स्टेशनवर PAN Card आणि Aadhar Card बनवता येणार)
रामेश्वर तेली यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी एलपीजी सिलिंडर न मागविण्याच्या कारणाचे स्पष्टीकरण देताना म्हटले की, नागरिक हे आहाराच्या सवई, कुटुंबातील सदस्य आणि इंधनाचे इतर पर्याय यांवरही ग्राहकांचे सिलिंडर मागविण्याचे प्रमाण ठरते असे तेली म्हणाले.