पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे ट्विटर अकाऊंट (Twitter Account) हॅक (Hack) करण्यात आले आहे. हे अकाऊंट मोदींच्या पर्सनल वेबसाईटशी (Personal Website) संलग्न आहे. याबाबत कंपनीला कल्पना आली असून अकाऊंट सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने कंपनीने पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे, अशी माहिती ट्विटरकडून (Twitter) देण्यात आली आहे. मोदींच्या ट्विटर अकाऊंटला 2.5 मिलियन्स पेक्षा अधिक फॉलोअर्स (Followers) आहेत.
अकाऊंट हॅक करण्यात आल्यानंतर पीएम नॅशनल रिलीफ फंडमध्ये (PM National Relief Fund) दान करण्याचे आवाहन फॉलोअर्सला करण्यात आले आहे. Cryptocurrency द्वारे तुम्ही हे दान करु शकता असे ट्विट्स अकाऊंटवर दिसत आहे. "हे अकाऊंट जॉन विक (John Wick, hckindia@tutanota.com) यांनी हॅक केलं असून आम्ही पेटीएम मॉल हॅक केलेले नाही," असे अजून एक बोगस ट्विट अकाऊंटवर दिसत आहे.
जुलै महिन्यामध्ये अनेक प्रमुख व्यक्तींचे अकाऊंट हॅक करण्यात आले होते. यात बिल गेट्स, एलोन मस्क, मायकेल ब्लूमबर्ग आणि अॅपल यांचा समावेश होता. यांच्या हॅक झालेल्या अकाऊंटवर बिटकॉइन घोटाळ्यासंबंधित मेसेजेस पाहायला मिळाले होते. (Twitter Accounts Hacked: अमेरिकेमध्ये बराक ओबामा, बिल गेस्ट सह हाय प्रोफाईल अकाऊंट्स हॅक; ट्वीटरचे सीईओ Jack Dorsey यांनी हा प्रकार धक्कादायक असल्याची व्यक्त केली प्रतिक्रिया)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, जो बिडेन, कान्ये वेस्ट, किम कर्दाशिअन वेस्ट, वॉरेन बफे, जेफ बेझोस आणि अमेरिकेतील कित्येक प्रसिद्ध व्यक्तींचे व्हेरिफाईड अकाऊंट क्रिप्टोकरन्सी स्कॅममध्ये हॅक झाले होते.