PM Narendra Modi YouTube Channel: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) प्रभाव कायम आहे. एकीकडे, पंतप्रधान मोदी जगभरातील नेत्यांना मान्यता रेटिंगमध्ये मागे टाकत आहेत, तर दुसरीकडे, त्यांनी यूट्यूबवर (YouTube) देखील सबस्क्रायबर्सच्या बाबतीत एक नवीन टप्पा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची गणना भारतातील अशा नेत्यांमध्ये केली जाते ज्यांनी डिजिटल लेन्सद्वारे राजकारणाचे जग पाहिले आहे. आज पीएम मोदींचे यूट्यूब चॅनल जगातील इतर कोणत्याही नेत्याच्या यूट्यूब चॅनेलपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स असलेले चॅनल बनले आहे. पीएम मोदींच्या नरेंद्र मोदी चॅनलचे 2 कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स झाले आहेत.
पीएम चॅनलची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यावर अपलोड केलेले व्हिडिओ लोकांना आवडतात आणि अनेकदा एखाद्या व्हिडिओला काही सेकंदात लाखो व्ह्यूज मिळतात. 2 कोटी सबस्क्रायबर्स असल्याचा विशेष दर्जा मिळवणारे पंतप्रधान मोदी हे जगातील पहिले नेते आहेत. काही महिन्यांपूर्वी, पीएम मोदींनी यूट्यूब फॅनफेस्ट इंडियाला संबोधित करताना, जवळजवळ 15 वर्षांपासून ते यूट्यूबच्या माध्यमातून देश आणि जगाशी जोडलेले असल्याचे पंतप्रधान म्हणाले होते. पीएम मोदींच्या यूट्यूब चॅनलवर 23 हजार व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. पहिला व्हिडिओ 12 वर्षांपूर्वी चॅनलवर पहिल्यांदा अपलोड करण्यात आला होता.
यूट्यूब व्यतिरिक्त, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील पीएम मोदींचे खूप मोठे चाहते आहेत. पीएम मोदींचे X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर 94 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. याशिवाय पीएम मोदींचे इंस्टाग्रामवर 82.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. फेसबुकबद्दल बोलायचे झाले तर पीएम मोदींचे 48 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याच वेळी, पीएम मोदींचे त्यांच्या व्हॉट्स अॅप चॅनेलवर 12.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. (हेही वाचा: Amrit Bharat Express Trains: वंदे भारतनंतर आता देशाला मिळणार कमी बजेटची 'अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन'; PM Narendra Modi 30 डिसेंबर रोजी दाखवणार हिरवा झेंडा)
पीएम मोदींनंतर, यूट्यूब चॅनेलवर सर्वाधिक सबस्क्राइबर्स असलेल्या दुसरा जागतिक नेता आहे ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनोरा. त्यांच्या चॅनलचे 64 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. जे नरेंद्र मोदी यूट्यूब चॅनलच्या एक तृतीयांशपेक्षा थोडे कमी आहे. राहुल गांधींच्या यूट्यूब चॅनेलचे 2023 मध्ये 22.5 लाख सदस्य झाले आहेत, तर नरेंद्र मोदी चॅनलने 2023 मध्ये 63 लाख सदस्यांसह जवळपास तिप्पट सदस्य जोडले आहेत. 2023 मध्ये भारतात सर्वाधिक नवीन सदस्य जोडणारा नेता आणि राजकीय पक्षाच्या यूट्यूब चॅनेलबद्दल बोलायचे तर, येथेही पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत.