PM Narendra Modi's Twitter  Hacked: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक; PMO कडून खुलासा
PM Narendra Modi (Photo Credits-File Image)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्वीटर अकाऊंट (PM Narendra Modi's Twitter) रविवार (12 डिसेंबर) दिवशी सकाळी हॅक झाल्याची बाब समोर आली आहे. हॅकर्सकडून पीएम नरेंद्र मोदी यांच्या अकाऊंट वरून क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) हे लीगल टेंडर म्हणून स्वीकरलं गेल्याचं एक खोडसाळ ट्वीट केले होते. पीएमओ च्या हा प्रकार लक्षात येताच हे ट्वीट डिलिट करण्यात आलं असून ट्वीटर कडे त्या संदर्भात तक्रार करण्यात आली आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या @narendramodi या हॅन्डल सोबत छेडछाडीचा प्रकार झाला आहे. त्यांनी केलेल्या ट्वीट नुसार, संबंधित प्रकराची ट्वीटरला माहिती देण्यात आली आहे. आता हे अकाऊंट पुन्हा सुरक्षित करण्यात आले आहे. यापूर्वी केलेल्या खोडसाळ ट्वीट कडे दुर्लक्ष करा असे देखील सांगण्यात आले आहे.

PMO चा खुलासा

अनेकांनी पीएमओ ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर करण्यात आलेल्या ट्वीट चा स्क्रिनशॉर्ट देखील ट्वीट केला आहे. इथे पंतप्रधानांचेच ट्वीटर अकाऊंट सुरक्षित नाही तिथे सामान्य भारतीय सोशल मीडीया हॅकर्स पासून काय सुरक्षित राहणार? नक्की वाचा: Twitter Accounts Hacked: अमेरिकेमध्ये बराक ओबामा, बिल गेस्ट सह हाय प्रोफाईल अकाऊंट्स हॅक; ट्वीटरचे सीईओ Jack Dorsey यांनी हा प्रकार धक्कादायक असल्याची व्यक्त केली प्रतिक्रिया .

दरम्यान सप्टेंबर 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेबसाईट, अ‍ॅप हॅ अपडेट करणारे ट्वीटर अकाऊंट देखील हॅक करण्यात आले होते. यावेळी क्रिप्टोकरन्सीसाठी विनंती करणारे ट्वीट पोस्ट करण्यात आले होते.