
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (27 जुलै) देशामध्ये नोएडा, मुंबई आणि कोलकत्ता या शहरामध्ये अद्ययावत, उच्च दर्जाच्या कोविड 19 लॅब्सचं उद्धाटन करणार आहेत. दरम्यान संध्याकाळी 4.30 च्या सुमारास व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा का कार्यक्रम पडणार आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आक्रमकपणे टेस्टिंग करण्याची पद्धत फायदेशीर असल्याचं सांगितलं जात असल्याने आता देशात कोरोनाबाधितांचा 14 लाखांचा टप्पा पार केल्यानंतर त्याचा प्रसार रोखण्यासाठी आता अधिक टेस्टिंग करण्यावर भर दिला जात आहे. कोविड 19 आजारावर प्रभावी लस, औषध येत नाही तोपर्यंत टेस्टिंगच्या माधयमातून रूग्ण ओळखून वेळीच विलगीकरण करून उपचार करण्यावर भर दिला जात आहे.
नरेंद्र मोदी यांच्याकडून आज भारतामध्ये सुरू करण्यात येणार्या उच्च दर्जाच्या लॅब्समध्ये आता दिवसाला 10,000 टेस्ट करण्याची क्षमता आहे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ कॅसर प्रिवेंशन अॅड रिसर्न्ड (NICPR) नोएडा, नॅशनल इंस्टीट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव हेल्थ (NIRRH) मुंबई व नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ कॉलरा एंड एंट्रिक डिजीज (NICED), कोलकाता या आयसीएमआरच्या केंद्रामध्ये लॅब्स सुरू होतील.
अत्याधुनिक लॅब्सची वैशिष्ट्यं
- नव्या टेस्टिंग लॅब्समध्ये एका दिवसांत 10 हजारांपेक्षा अधिक सॅम्पल्स तपासले जाऊ शकतात.
- नव्या लॅबमध्ये तपासणी करणार्या व्यक्तीला संसर्गाचा धोका कमी असेल.
- कोविड 19 कोरोना संकटानंतर या अद्ययावत लॅब्स एचआयवी, डेंगी, टीबी, हेपिटायटीस सी, बी अशा आजारांमध्येही नमूना तपासणीसाठी वापरता येऊ शकते.
दरम्यान या अद्यावत लॅब्सच्या उद्घाटनाला देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासोबतच महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील ऑनलाईन उपस्थिती लावणार आहेत.