PM Narendra Modi interacting with CMs of different state over coronavirus outbreak (Photo Credits: IANS)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उद्या म्हणजेच सोमवारी 11 मे रोजी दुपारी 3  वाजता देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंग च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. याबाबत पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर (PMO Tweet) अकाउंट वरून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन लागू झाल्यापासून पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबत ही 5वी व्हिडीओ कॉन्फरन्स असणार आहे. या मध्ये सर्व राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. तसेच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सुरु असणाऱ्या सोयी सुविधांबाबत सुद्धा चर्चा केली जाणार आहे. यापूर्वी पार पडलेल्या कॉन्फरन्स मध्ये मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांना लॉक डाऊन मध्ये वाढ करण्याचे आवाहन केले होते. सध्या सुरु असणाऱ्या लॉक डाऊन (Lockdown)  च्या तिसऱ्या टप्प्याचा अवधी सुद्धा 17 मे पर्यंत असणार आहे त्याआधीच चर्चा करून लॉक डाऊन वाढवण्यासंबंधी सुद्धा निर्णय घेतले जाऊ शकतात.

लॉक डाऊनचा तिसरा टप्पा म्हणजेच 4  मे ते 17 मे पर्यंत असणाऱ्या या लॉक डाऊन मध्ये अनेक राज्यातील उद्योग धंद्यांना सूट देण्यात आली आहे. जी राज्य पूर्णतः कोरोना मुक्त आहेत म्हणजेच ग्रीन झोन मध्ये आहेत तिथे नियमित कामकाज सुरु करण्याची परवानगी याआधीच गृहमंत्रालयाने दिली आहे. तसेच ऑरेंज झोन च्या बाबतही अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. उद्याच्या कॉन्फरन्स मध्ये अजून कोणते नियम हटवता किंवा लागू करता येतील याचा आढावा घेतला जाईल.Lockdown: लॉकडाऊन नंतर पुढे काय? केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली मार्गदर्शक तत्वं

PMO ट्विट

कोरोनाच्या बाबत काल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी माहिती देताना देशातील कोरोनाचा मृत्यू दर हा बरे होणाऱ्या रुग्णांच्या टक्केवारी नुसार बराच कमी असल्याची दिलासादायक माहिती दिली होती. मात्र दुसरीकडे कोरोनाचे दिवसागणिक वाढणारे आकडे सुद्धा तितकेच चिंताजनक आहेत. आज स्थितीत भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 62,939 वर पोहोचली आहे. यात 41,472 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 19,358 रुग्ण बरे झाल्याची माहिती मिळत आहे. तर आतापर्यंत देशात एकूण 2109 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे.