PM Modi On Farm Bill Approved In Parliament: कृषी विधेयकं मंजुर झाल्यावर पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांंचंं खास ट्विट, इथे पाहा
Narendra Modi (Photo Credits: IANS)

राज्यसभेत विरोधकांच्या प्रचंड गोंंधळात आज कृषी विषयक (Farm  Bill) विधेयकं मंजूर करण्यात आली. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी या दोन विधेयकांना मंजुरी देण्यात आली आहे. यानंंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांंनी खास ट्विट करुन देशातील सर्व शेतकर्‍यांंचे अभिनंंदन केले आहे. मोदी ट्विट मध्ये म्हणतात की, "आपल्या देशातील शेतीला तात्काळ आधुनिक करण्याची गरज आहे. या विधेयकांंच्या मदतीने भविष्यात शेतकर्‍यांंना तंंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करणे सुकर होईल याने केवळ उत्पादनच वाढणार नाही तर आर्थिक फायद्या सुद्धा जवळपास दुप्पट होईल यामुळे शेतकर्‍यांंना मदतच होणार आहे त्यामुळे हा निर्णय स्वागत करण्याजोगा आहे."

प्राप्त माहितीनुसार, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी विधेयकं मांडल्यावर. विरोधकांकडून सभागृहात गोंधळ घालण्यात आला. वेलसमोर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सोबतच विधेयकाची प्रत हिसकावण्याचा प्रयत्नही करण्यात आला. या सर्व विरोधावर यापुर्वी सुद्धा मोदींंनी उत्तर देत तुम्हाला भटकावण्याचा प्रयत्न केला जात आहे असे नागरिकांंना संबोधुन म्हंंटले होते तर आज सुद्धा विरोध होत असला तरी ही विधेयकं शेतकरी बांंधवांंच्या किती हिताची आहेत यावरही मोदींनी भाष्य केले आहे. या विधेयका नंंतरही MSP व्यवस्था, सरकारी खरेदी कायम राहणार आहे, असंही मोदींंनी स्पष्ट केलं आहे.

नरेंद्र मोदी ट्विट

दरम्यान, हे दोन्ही कायदे ऐतिहासिक असून, शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठे आणि महत्वाचे बदल घडवून आणतील. शेतकरी त्यांचा शेतमाल देशभरात कुठेही विकू शकतील. ही विधेयके एमएसपीशी संबधित नाहीत, असं आश्वासन देत कृषीमंत्री तोमर यांनी विधेयक मांडली होती जी आवाजी मतदान घेउन आज राज्यसभेत सुद्धा मंजुर करण्यात आली आहेत.