Bakri Eid 2023 Wishes: देशभर आज बकरी ईद चा उत्साह; PM Narendra Modi  यांनी दिल्या शुभेच्छा!
Narendra Modi | (Photo Credits: ANI/ Twitter)

महाराष्ट्रात आज एकीकडे आषाढी एकादशीचा मंगलमय सण साजरा केला जात आहे तिथे दुसरीकडे देशभर मुस्लिम बांधव बकरी ईद देखील साजरी करत आहेत. बकरी ईदचं (Bakri Eid) औचित्य साधत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील मुस्लिम बांधवांबा बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीट करत नरेंद्र मोदींनी Eid-ul-Adha चा दिवस आज तुमच्या आयुष्यात आनंद, उत्साह घेऊन येवो समाजात ऐक्य वृद्धिंगत होवो अशी कामना व्यक्त केली आहे.

देशभर आज मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या निमित्ताने सकाळी नमाज अदा केली आहे. ऐकमेकांना गळाभेट घेत बकरी ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. Lucknow Eidgah Imam Maulana Khalid Rasheed Firangi Mahali यांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देताना सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देणं टाळा, रस्त्यावर कचरा फेकणं टाळा तसंच नमाज ही मशिदी मध्ये अदा करा रस्त्यावर नको असं आवाहन देखील केलं आहे. नक्की वाचा: Bakari Eid 2023:जाणून घ्या बकरीद सणाचे महत्त्व; म्हणून दिली जाते बकरीची बळी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा  

मुस्लिम बांधव धु अल-हिज्जाच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यास सुरूवात करतात. त्यानंतर 4 दिवस त्याचे सेलिब्रेशन केले जाते. हा सण कुर्बानीचा सण किंवा पवित्र हज यात्रेचा सण म्हणूनही ओळखला जातो.