PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

हिमाचल प्रदेश येथील कुल्लू जिल्ह्यातील बंजार भागात खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला. तर 35 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरु असून जखमींवर रुग्णालयात उपचारही सुरु आहेत. (हिमाचल प्रदेशात बसला भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू)

या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रीया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "कुल्लू येथे झालेल्या अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचे मी सांत्वन करतो. मी आशा करतो की जखमी देखील लवकरच बरे होतील. अपघातग्रस्तांना आवश्यक ती मदत हिमाचल प्रदेश सरकार करत आहे."

ANI ट्विट:

खाजगी बस बंजार येथून गादागुशानी येथे जात असताना 500 फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला.